मुंबई : दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ फुल मार्केट परिसरात प्रसिद्ध असलेल्या सखी जेम्स अँड ज्वेलर्स येथे गौरी-गणपती उत्सवानिमित्त विविध आकर्षक आणि विशेष अलंकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गणेशभक्तांच्या श्रद्धेला आणि उत्सवाच्या आनंदाला साजेसे गणपती बाप्पांच्या पादुका, आशीर्वाद देणारा हात, मोदक, पोषक तसेच विविध प्रकारच्या कंठी आणि इतर आकर्षक अलंकारांची खास रेंज दुकानात उपलब्ध आहे. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक दागिन्यांची सुंदर सांगड घालणारे हे अलंकार गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.
गौरी-गणपतीच्या सणानिमित्त आपल्या आवडीचे अलंकार खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी सखी जेम्स अँड ज्वेलर्सला एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांनी केलेल्या खरेदीनुसार त्यांना दुकानाकडून मोफत छोटी भेटवस्तू देण्यात येणार आहे. यामध्ये मोदकासह विविध आकर्षक भेटवस्तूंचा समावेश असू शकतो.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा, परंपरा आणि आकर्षक दागिन्यांचा अनोखा अनुभव घेण्यासाठी सखी जेम्स अँड ज्वेलर्सला अवश्य भेट द्यावी.




