ताज्या बातम्या

हौसाई विद्यालयात वृक्षारोपण उत्साहात….. ‘निसर्गाला जपले तरच निसर्ग आपल्याला जपेल’ – प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी

मलकापूर : हौसाई विद्यालय, मलकापूर येथे संतकृपा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. स्वानंद कुलकर्णी म्हणाले, “आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपल्याला जपेल. आज पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून ते रोखण्यासाठी वृक्षलागवडीशिवाय पर्याय नाही. मात्र, केवळ वृक्ष लावून चालणार नाही, तर लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.”
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. अनेक वृक्ष बहुउपयोगी असून मानवी जीवनात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे जतन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले.
यावेळी प्राचार्य सतीशकुमार सावळकर, मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, शुभांगी पाटील, अंजली जानुगडे, वैशाली पवार, पद्मावती मुळीक, रघुनाथ पाटील, सुधाकर कांबळे, ऋषिकेश पोटे, योजना पाटील, कांबळे मॅडम, सुभाष थोरात, चव्हाण सर, विकास शिंगाडे, अशोक साठे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top