ताज्या बातम्या

कास फुलोत्सवाच्या मुहूर्तावर काचेच्या बाटल्याचीही लगबगीची चर्चा…

सातारा(अजित जगताप) : जागतिक पर्यटन स्थळ विकसित झाल्यापासून कास पठारावर विविध जातीची फुल उगवतात. तशी कृषी पर्यटन व हॉटेल उभारले गेले आहेत. अर्थात व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम होत असले तरी काहींच्या अति ताईपणामुळे कास पठारावर व्यसनी टोलक्यांमुळे काच पठार पुन्हा होणार असल्याची चर्चा आहे.
कास पठारावरील स्थानिक शेतकऱ्यांनी पशुधन पाळून या ठिकाणी फुल निर्मितीसाठी कष्ट घेतले आहेत. आता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काहीच शिरकाव झालेला आहे. कास पठारावर नैसर्गिक साधनसामग्री व विविध फुलांच्या नेत्रदीपक दर्शनाने पर्यटक भारावून जातात. त्याचबरोबर पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचाही पुरवठा करणे हे गरजेचे आहे. त्या अर्थाने कास पठार परिसरात अनेक नामांकित व सर्व नियमाचे पालन करून चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणारे अनेक हॉटेल व कृषी पर्यटन आहे. स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करण्यामध्ये पर्यटकांचा सिंहाचा वाटा आहे. या ठिकाणी दरवर्षी पुष्प पठार पाहणारे पर्यटक भेट देत आहेत. येथील दर्जेदार व गुणवत्ताधारक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतल्यानंतर चांगला अभिप्राय व्यक्त करतात. ही जशी एक बाजू आहे तशी दुसरीही बाजू स्थानिकांना माहिती आहे. वाढते अतिक्रमण व कोर्टकचेऱ्या यामध्ये वेळ वाया घालवणे आणि आपले हित साध्य करणे. काही हॉटेलमध्ये दारू पिण्यास सक्त मनाई आहे. असे फलक लावले जातात. तरीही बाहेरून मोठ्या प्रमाणात वाईन शॉप मधून आणलेली दारू या ठिकाणी पिण्यासाठी सुख सुविधा दिली जाते. त्यासाठीच काचेची ग्लास स्वच्छ धुण्याची सुद्धा लगबग सुरू झालेली आहे. हे पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही. परंतु काही अटी व शर्तीनुसार मुभा दिली जाते. याची यानिमित्त चर्चा होत आहे. पर्यटन स्थळ म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाचा आनंद लुटणारे ठिकाण आहे. काहींच्या अतिउत्सापणामुळे संपूर्ण कास पठार बदनाम होत आहे. दिनांक १ सप्टेंबर पासून कास पठाराव फुले उमलण्यास सुरुवात होणार आहे त्याची तयारी शासकीय पातळीवर वन व्यवस्थापन समिती, वनविभाग व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेले आहे. तेवढ्याच ताकतीने व्यसनी लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचाही पुरवठा सुरू झालेला आहे. या ठिकाणी तातडीने धाड टाकून यावर नियंत्रण अन्य गरजेचे आहे. सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी काही काळासाठी या भागातील दोन नंबरचे धंदे बंद करून नावलौकिक प्राप्त केले होते. तसेच कारवाई पुढे व्हावी अशी अनेकांनी मागणी केली आहे. स्थानिक कृषी पर्यटन व हॉटेल व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध व्हावा. याबद्दल कुणाचेही दुमत नाही. परंतु ,दिशाहीन भूमिका घेऊन काही दोन नंबरचे व्यवसाय करतात. त्यांच्याबद्दल मूग गिळून बसणे. म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार आहे. हे आता कुणीतरी लक्षात आणून देणे गरजेचे आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणेने सतर्क राहून तातडीने कारवाई करावी व त्याची माहिती निसर्गाचा शांततेने आनंद घेणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचवावी. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान ,कास पठारावर मद्यपान, धूम्रपान किंवा इतर व्यसनांवर कडक अंकुश ठेवण्यासाठी प्रवेशद्वारावर कसून तपासणी करावी. दारू व सिगरेट कोणत्या दुकानातून घेतलेले आहे. त्या दुकानदारांना एकदा तरी समज द्यावी. सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षकांची गस्त वाढवणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि पर्यटकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रवेशद्वारांवरच बॅग आणि वाहनांची कसून तपासणी करून मद्य, सिगारेट किंवा गुटखा यांसारखे पदार्थ आत नेण्यास सक्त मनाई करावी पठारावर व संवेदनशील परिसरामध्ये सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची गस्त सतत सुरू ठेवावी. नियम मोडून मद्यपान किंवा धूम्रपान करणाऱ्या पर्यटकांवर तात्काळ मोठा दंड ठोठावून त्यांना बाहेर काढावे. मुख्य पादचारी व पुष्प क्षेत्रामध्ये खाजगी वाहनांना सक्त प्रवेश बंदी व पार्किंग व्यवस्थेचा वापर बंधनकारक करावा.

Scroll to Top