ताज्या बातम्या

पाचवड फाटा ते येळगाव फाटा रस्त्यालगत नाला खोलीकरण व साफसफाईला सुरुवात; नागरिकांमध्ये समाधान

कराड : सार्वजनिक बांधकाम विभाग (मार्ग प्रकल्प) यांच्या वतीने कराड दक्षिण हद्दीतील पाचवड फाटा ते येळगाव फाटा या महत्त्वाच्या मार्गालगत नाला खोलीकरण व साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी कमी होण्यास मदत होणार असून वाहनधारक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या मार्गावरील नाल्यांमध्ये गाळ, माती व झाडाझुडपांचा मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास मदत होईल आणि रस्त्याचे नुकसान तसेच अपघातांचा धोका कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून, नाला साफसफाईबरोबरच रस्त्यावरील पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक व इतर आवश्यक दुरुस्तीची कामेही तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.

Scroll to Top