
सातारा(अजित जगताप ) : सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध निधी खर्च केला जातो. काही ठिकाणी नागरी सुविधा ऐवजी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने रुग्णांची हेळसांड होते. आता तर कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क आरोग्यसेविकेलाच तक्रार देण्याची वेळ आली. अखेर सातारा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतच जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांना संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची घोषणा करावी लागली तर कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कदम यांची चौकशी सुरू झाली आहे.
रयतराज संघटना अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेतल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश कदम यांच्याकडून शासकीय औषधाची चोरी, सेवेत कार्यरत असताना खाजगी दवाखाना चालवणे, आरोग्य महिला कर्मचाऱ्यांचे गंभीर लैंगिक व मानसिक छळ करणे. याबाबतची लेखी तक्रार जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आली होती. नंतर आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असतानाच बाहेर आंदोलकांनी आंदोलन सुरू केले.
रयतराज संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिता जाधव,उज्वला सुतार , राजश्री देशमुख, मंदाकिनी घोरपडे, राजश्री जाधव, पूनम कवळे, रेणुका पवार, रेखा खिलारी सविता कांबळे, रेश्मा आवळे,सत्यवान निमज ,महेश जाधव ,शशिकांत शिंदे ,भरत पिसाळ यांच्यासह आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले. त्याची गंभीर दखल घेऊन अखेर सभागृहातच डॉ. प्रकाश कदम यांचे निलंबन व कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर अनिल कदम यांच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये ७१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कोळे तालुका कराड येथील वैद्यकीय अधिकारी ही चड्डी बनियानवर दवाखान्यात बसून महिला कर्मचाऱ्यांच्या बद्दल अपशब्द वापरतात. याचा पुरावा सादर करण्यात आला. या चड्डी बनियान घालून बसलेल्या वैद्यकीय अधिकारी कम रुग्णाचा उपचार करण्यासाठी अखेर रयतराज संघटनेने पुढाकार घेतला. आंदोलनाचे सलाईन लावल्यानंतरच वैद्यकीय अधिकाऱ्यांना चूक समजली. तसेच जिल्हा परिषदेला कारवाई करणे सोपे झाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये वैद्यकीय नव्हे तर इतर अनेक विभागाबद्दल आंदोलन व तक्रार केली जाते. परंतु त्या ठिकाणी सराईतपणाने वावरणारांना वेळेत भत्ता मिळत असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले जाते. याचा अनुभव घेतलेल्या रयतराव संघटनेच्या अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा मोका बघून आंदोलनाचा चौका मारला आहे. त्यामुळेच कडक कारवाई झाली आहे. अन्यथा हे प्रकरण सुद्धा दडपले असते. अशी चर्चा सुरू झालेली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा सहा तास चालल्याने खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न व विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती करणे आवश्यक बाब बनलेली आहे. ग्रामीण भागात अनेक जिल्हा परिषदेच्या कार्यालयात चांगले काम करणाऱ्यांना कौतुक करण्यास आंदोलन विसरले नाहीत.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळेला जिल्हा परिषदेमध्ये तपासणी करूनच प्रवेश दिला . आणि आज सर्वसाधारण सभा सुरू असताना चौथ्या मजल्यापर्यंत आंदोलन पोहोचले. याबाबत ग्रामीण भाषेतच जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे यांनी घरचा आहेर दिला आहे. त्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.
———————————————
फोटो- सातारा जिल्हा परिषद आंदोलकांनी गाजले व वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी




