प्रतिनिधी : दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. अशातच 12 वी चा निकाल मे 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
तसेच दहावीचा निकाल 1, 2 किंवा 3 जूनला लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र यामध्ये बदल देखील होऊ शकतो. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

SMS द्वारे निकाल कसा पाहावा
▪️ 10वी चा निकाल पाहण्यासाठी मेसेजमध्ये MHSSC सीट क्रमांक टाइप करा .
▪️ तसेच 12वी चा निकाल पाहण्यासाठी मेसेजमध्ये MHHSC सीट क्रमांक टाइप करा .
▪️ त्यानंतर 57766 या नंबरवर एसएमएस पाठवा.
▪️ यानंतर अगदी काही सेकंदात तुम्हाला निकाल मेसेजद्वारे मोबाईलवर येईल.