प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यानं होणारे बदल नवनवीन समस्य़ा निर्माण करताना दिसत आहेत.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे.
तर दुसरीकडे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली असून विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा
(30-40 किमी प्रतितास वेग)
हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
खालीलपैकी या जिल्ह्यांत असणार उष्णतेची लाट :
- रायगड
- रत्नागिरी
- जळगाव
- नाशिक
- सोलापूर
- बीड
इशारा : तडक उन्हातून आल्यानंतर थंड पाणी सेवन करू नका
उघड्या डोक्याने उन्हामध्ये फिरू नका.
शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घोट घोटभर सातत्याने पाणी पीत राहा.
बाहेरील शीतपेय कटाक्षाने टाळा..
त्या ऐवजी नारळ पाणी उसाचा रस ताक किंवा साधे पाणी प्या
