प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील वारसोळीदेव गावचे ग्रामदैवत ‘ श्री वाघजाई महाकाली व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे भव्य उद्घाटन, प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहन सोहळा साधू-महंत,परमार्थिक, सामाजिक तसेच राजकिय व्यक्तींच्या उपस्थितीत “भव्य दिव्य अशा स्वरूपात” होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर जनसेवक व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला इतर पाहुणे खासदार उदयनराजे भोसले, श्रीकांत शिंदे, नितीन काका पाटील, आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, माजी आमदार दगडू दादा सकपाळ, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाबळेश्वर बाबुराव दादा सकपाळ, माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती अमित दादा कदम, सभापती शंकरराव मोरे आरोग्य समिती नवी मुंबई, त्याचबरोबर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे ग्रामस्थ यांनी कळवले आहे.
वारसोळीदेव गावचे ग्रामदैवत ‘ श्री वाघजाई महाकाली व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे भव्य उद्घाटन, प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहन सोहळा
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे
८ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मूर्तीचा अभिषेक व चंद्रभागा स्नान होईल ९ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे पंचगंगा स्नान होईल व त्यानंतर क्षेत्र महाबळेश्वर ते वारसोली देव देवतांच्या मूर्ती यांची भव्य मिरवणूक विश्वंभर बाबा अधत्मिक वारकरी शिक्षण संस्था मेढा तालुका जावळी ह. भ. प. अतुल महाराज देशमुख यांच्या संस्थेतील मुलांचा भव्य दिव्य दिंडी सोहळा,
१० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा दुपारी १ वाजता महाप्रसाद त्यानंतर प्रमुख पाहुणे यांचे स्वागत नंतर भावधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संध्याकाळी यात्रेनिमित्त ओटी भरणे, पालखीची भव्य मिरवणूक (छबिना) व देवीच्या जागरण गोंधळ,
१२ फेब्रुवारी २०२५ रोजी बुधवारी मनोरंजन कार्यक्रम लोकनाट्य तमाशा व दुपारी भव्य कुस्तीचे जंगी मैदान, तरी या कार्यक्रमाला महाबळेश्वर जावळी व सातारा यासह मुंबई वासियांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थ मंडळ वारसोळी देव व
श्री वाघजाई महाकाली मंदिर जिर्णोद्धार कमिटी यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
सर सुंदर बातमी
नाचु किर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी