Sunday, April 20, 2025
घरमहाराष्ट्रहार्बर रेल्वे मार्गावरील नेरुळ स्थानकावर प्रवाशांना सकाळी ७ नंतर तिकीट मिळते त्याअगोदर...

हार्बर रेल्वे मार्गावरील नेरुळ स्थानकावर प्रवाशांना सकाळी ७ नंतर तिकीट मिळते त्याअगोदर नाही; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी : नेरूळ पश्चिम येथील रेल्वे टिकिट घर येथील कर्मचारी सका.७.०० वाजल्याशिवाय प्रवाशांना तिकिट देत नाही. सका.७.०० पूर्वी सुरू असणाऱ्या ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवास करावा लागतो.
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शन येत आहे.
रेल्वे प्रवाशांना होतोय मनस्ताप! कर्मचारी उद्धट बोलून दादागिरी करतात. हार्बर रेल्वे मार्गावरील नेरूळ रेल्वे स्टेशन हे प्रवाशांनी सतत गजबजलेले असते.
नेरूळ पुर्व तसेच पश्चिम या दोन्ही ठिकाणी दाट लोकवस्ती आहे, दोन्ही ठिकाणी रेल्वे टीकीट घर आहेत.
परंतु पश्चिम या ठिकाणी सका.७.०० वाजल्याशिवाय टिकिट घर खुले होत नाही. त्यामुळे सका ५ .०० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या ट्रेन मधून विनातिकीट,पास शिवाय प्रवास करावा लागतो
आज दि१५/६/२०२४ रोजी मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून सुरु असणार्या सखोल स्वच्छता अभियानासाठी लवकर जाण्यासाठी निघालो असता रेल्वे पास संपला आहे हे लक्षात येताच,
पास काढण्यासाठी गेलो असता टिकीट घरामध्ये असणार्या कर्मचार्याकडे प्रथम श्रेणी पासची मागणी केली असता ७.०० च्या नंतर या असे उर्मट भाषेत बोलत होता.सका ७.३९ ची गाडी पकडण्यासाठी कर्मचार्याला विनंती करुन सुध्दा पास देण्यास नकार दिला,तसेच टिकिट घर सोडून बाहेर येऊन दादागिरीची भाषा करीत होता.कर्मचार्याला नाव विचारले असता नाव सांगणेस नकार दिला.तिकिट काउंटर सोडून प्रवाशांच्या अंगावर येणार्या रेल्वे कर्मचारी यांची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे,तसेच तिकिट घरामध्ये कर्मचारी असताना सुद्धा टिकिट किंवा पास न देणे याला काय म्हणावे?
असे अनेक प्रवाशांना दररोज विनातिकीट तसेच मनस्ताप करून प्रवास करावा लागतो.
सकाळी पहाटे साडेचार,पाच वाजल्यापासून सुरू होणाऱ्या रेल्वेमधून प्रवास करणार्या नेरूळ पश्चिम येथे ७.०० वाजल्याशीवाय अनेक वर्षे तिकिट देण्याची व्यवस्था नाही.
रेल्वे प्रशासन या कडे लक्ष देईल का?
तसेच अनेक वर्षांची असणारी ही रेल्वे प्रवाशांची मागणी पूर्ण कधी होणार? असे प्रवाशी विचारत आहेत.
नेरूळ पश्चिम ला दिवसेंदिवस वस्ती वाढत आहे.
नवीमुंबई मधील नेरूळ हा ५२ सेक्टरचा सर्वात मोठा नोड आहे त्यामुळेच नेरूळ मध्ये दोन रेल्वेस्टेशन रेल्वे प्रशासनाने उभारली आहेत एक नेरूळ तर दुसरे सिवूड -दारावे अशी रेल्वे स्टेशन आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments