प्रतिनिधी : चेंबूर विधानसभा प्रभाग क्रमांक १५५ मधील लालडोंगर मध्ये शनिवार दि १५ जून २०२४ रोजी सकाळी झोपडी कोसळली सदरच्या झोपडीला धोकादायक झोपडी म्हणून महानगरपालिकेने नोटीस देऊनसुद्धा विकासकाने हलगर्जीपणा केल्यामुळे हा प्रकार घडला सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही परंतु पावसाळ्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडू शकतात याची खबरदारी घेतली पाहिजे.
या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी पदाधिकारी यांच्याबरोबर घटनास्थळी भेट देऊन महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून अशा धोकादायक झोपड्यांचे निष्काशन तातडीने करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी स्थानिक शाखाध्यक्ष प्रकाश प्रभू, शाखाध्यक्ष दिनेश येसकर, उपशाखा अध्यक्ष नवनाथ काळे उपस्थित होते.
