Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रया बहिणींना  १५०० रुपयाऐवजी मिळणार ५०० रुपये ...

या बहिणींना  १५०० रुपयाऐवजी मिळणार ५०० रुपये …

प्रतिनिधी : १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत. नमो शेतकरी महासंन्मान निधी मिळत असल्याने लाडकी बहिणीच्या हफ्त्यात कपात होणार आहे. आठ लाख महिलांना नमो शेतकरी कार्यक्रमांतर्गत एक हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येतो. दरम्यान, सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीत आठ लाख महिलांना दोन योजनांचा लाभ मिळत असल्याचे समोर आले आहे. तर दोन सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणाऱ्या हफ्त्यात निधीची कपात होणार आहे.

यानुसार, आता या महिन्यापासून आठ लाख लाडक्या बहिणींना आता महिन्याला १५०० रुपयाऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, आठ लाख लाडक्या बहिणींना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळत असल्याचं छाननीतून समोर आले आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेतून १००० रुपये मिळत असल्याने लाडकी बहिणी योजनेच्या हफ्त्यात कपात होणार आहे. छाननीत अर्ज आढळलेल्या आठ लाख महिलांना या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून फक्त ५०० रुपये मिळणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा खर्च ४६ हजार कोटींहून ३६ हजार कोटी करण्यात आला असल्याची माहितीही समोर आली आहे.”

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments