Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रशिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात

शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात

ठाणे :- तुकाराम महाराजांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटूंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून
आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. त्यांनी असा टोकाचा निर्णय घेऊन अकाली जीवन संपवल्याने देहू नगरीत मोठी हळहळ व्यक्त केली गेली होती.
दिवंगत मोरे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून ही मदत घेऊन त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्याघरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे.
आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याच विनवणीला साद देत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments