प्रतिनिधी : अयोध्येच्या श्रीराम मंदिरात अभिमंत्रित केलेल्या धनुष्यबाणासह महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे हे बुधवारी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृतीस्थळावर पोहोचले.”अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्यावर यंदाची पहिलीच रामनवमी आहे. म्हणून रामनवमीच्या निमित्ताने स्मृतिस्थळावर येऊन नतमस्तक झालो” अशा शब्दांत राहुल शेवाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. स्मृतिस्थळावर नतमस्तक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार सदा सरवणकर, शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, विभागप्रमुख अविनाश राणे,निशिकांत पाठारे, जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ. कामिनी राहुल शेवाळे, नगरसेवक समाधान सरवणकर, शीतल गंभीर, अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक, महायुतीचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
अयोध्येतील तपस्वी छावनीचे पीठाधिश्वर जगतगुरु परमहंस आचार्य यांच्या निमंत्रणावरून रामनवमीच्या पूर्वसंध्येला राहुल शेवाळे अयोध्येत दाखल झाले. मंगळवारी संध्याकाळी राहुल शेवाळे अयोध्येच्या राम मंदिरात दर्शनासाठी गेले असता तेथील संत महंतांनी मंदिरात अभिमंत्रित केलेला धनुष्यबाण त्यांना सुपूर्द करत विजयासाठी आशीर्वाद दिला. हा धनुष्यबाण घेऊन राहुल शेवाळे रामनवमीच्या दिवशी मुंबईत दाखल झाले आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी आले. यावेळी त्यांनी अयोध्येतील धनुष्यबाण या स्मृतिस्थळावर ठेवून बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि रामनवमी साजरी केली. यांनतर राहुल शेवाळे यांनी वडाळा येथील राम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले.
राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया
अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, ही बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न आमच्या मनात जागृत ठेवणारे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळावर दाखल झालो आहे. अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील संत महंतांनी अभिमंत्रित करून दिलेला धनुष्यबाण घेऊन स्मृतिस्थळावर नतमस्तक होऊन रामनवमी साजरी केली.