Friday, August 22, 2025
घरमहाराष्ट्र‘धर्मराज्य पक्षा’च्या ‘ईव्हीएम’विरोधी जनआंदोलनासंदर्भात, पक्षाध्यक्ष राजन राजेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!

‘धर्मराज्य पक्षा’च्या ‘ईव्हीएम’विरोधी जनआंदोलनासंदर्भात, पक्षाध्यक्ष राजन राजेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!

मुंबई (प्रतिनिधी) : भविष्यातील सर्व निवडणुका ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरात जनजागृती आंदोलन आणि जनमत चाचणी घेण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची, १९ जानेवारी-२०२५ रोजी, मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राजन राजे यांचे सुपूत्र ऋग्वेद राजे, ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. या भेटीदरम्यान प्रचलित ‘ईव्हीएम’वरील अत्यंत संशयास्पद मतप्रक्रियेसंदर्भाने सखोल चर्चा झाली. त्याचबरोबर ठाणे जिल्हा प्रीपेड स्मार्ट मीटर (घरगुती इलेक्ट्रिक मीटर) विरोधी समितीला लवकरच भेटीसाठी बोलावण्याचं आश्वासन, उद्धव ठाकरे यांनी राजन राजे यांना दिले. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी, ‘ईव्हीएम’ मुद्द्यापलिकडे जाऊन, मतदानासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला व उपस्थित सर्वांना एकूणच मतप्रक्रियेबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं. दरम्यान, राजन राजे यांनी, सत्ताधारी भाजप-एनडीए आघाडी, ‘प्रजासत्ताका’चा अमृतमहोत्सव साजरा करण्याबाबत, पूर्णतया उदासीन असण्यामागे, त्यांचा ‘प्रजासत्ताक-संकल्पने’लाच मुळातून विरोध असल्याचा मुद्दा ठासून मांडला. मुठभरांच्या हातात सत्ता केंद्रित करण्याची, वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकता असणाऱ्यांचा भाजप हा पक्ष असल्यानेच, ते घडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, ‘ईव्हीएम’ हॅक अथवा मॅनेज (प्रोग्रॅम्ड) होवोत वा न होवोत… आता, जनतेला पूर्वीचीच कागदी-मतपत्रिकेवरील पारदर्शक-मतदानप्रक्रिया हवी असल्याचं, राजन राजे यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं व त्यासंदर्भात ‘धर्मराज्य पक्ष’ मोहिम राबवत असल्याचं व प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवदिनी म्हणजेच, २६ जानेवारी-२०२५ रोजी रात्रौ ठीक ९.०० वा. फक्त ५ मिनिटे ‘ईव्हीएम’चा निषेध म्हणून सर्व घरातील लाईट्स बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात असल्याचंही उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातलं. याचसंदर्भात, दि. २८ जानेवारी रोजी, सायंकाळी ६.०० वा. ठाणे शहरातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात राहुल चिमणभाई मेहता यांनी बनवलेल्या, ईव्हीएम मशीनद्वारे, अमित उपाध्याय व मेघराज जोशी यांचा चमू, ‘ईव्हीएम’ कसं ‘मॅनेज’ केलं जाऊ शकतं, याचं प्रात्यक्षिक आयोजित केल्याची माहिती यावेळी देताच, त्यावर उद्धव ठाकरे यांनी, त्यादिवशी मुंबईत असल्यास, सदर कार्यक्रमाला आवर्जून येण्याचं आश्वासन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांना दिलं.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments