प्रतिनिधी : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव (नाना) घोलप यांच्या आदेशानुसार गुरूवारी सेक्टर ४ च्या महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी व वसंतराव भागवत शाळेतील विद्यार्थी यांना मोफत स्कूल बॅग वाटप राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय महा सचिव पंढरीनाथ पवार व माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्षा सौ. संध्या दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व वसंतराव भागवत विद्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे, पोलीस निरीक्षक वसंत शेळके, पोलीस उपनिरीक्षक गौरव कदम, समाजसेवक योगेश पाटील, महादेव भिंगार्डे, दादाभाऊ माने, बाबू गोरे, श्री. पगारे, श्री. उतेकर, योगिराज स्वामी, व सौ. कांचनताई खाडे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे संयोजन वसंतराव भागवत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैभवी बुधकर मॅडम व मनपा शाळेच्या प्रभारी शिक्षिका सौ. नीलम पिंपळे मॅडम यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ, उत्तर मुंबई यांनी केले होते. त्यावेळी चारकोप पोलीस ठाण्याच्या वतीने मुलांना व मुलींना रायजिंग डे च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मोफत शालेय बॅगा वाटप
RELATED ARTICLES