Monday, October 27, 2025
घरमहाराष्ट्रडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे

डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे


कुडाळ (अजित जगताप) : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे यांची निवड संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली आहे. संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच सातारा येथे पार पडली. यावेळी संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, साप्ताहिक संघटनेचे राज्याध्यक्ष संजय कदम, राज्य सहसमन्वयक गणेश बोतालजी, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे यांची उपस्थिती होती.

यावेळी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे तर जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय पानसांडे, जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप माने, युवराज धुमाळ, सुजितकुमार ढापरे, महेश नलावडे, राहिद सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी प्रशांत बाजी तर सहसचिव अशोक इथापे यांची निवड केली आहे. खजिनदारपदी लिंगराज साखरे, प्रसिद्धीप्रमुखपदी राहुल ताटे, जिल्हा संघटकपदी मिलिंद लोहार, जिल्हा संपर्कप्रमुखपदी सोमनाथ साखरे यांची नियुक्ती करण्यात आली.
सूर्यप्रताप कांबळे, संदीप जठार, श्रीधर निकम, संजय कारंडे, नवनाथ पवार यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
यावेळी नवीन कार्यकारिणी सत्कार करण्यात आला. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले आहेत. पत्रकारांच्या या संघटनेमुळे ग्रामीण भागातील अनेक अभ्यासू व निस्वार्थीपणाने वार्तांकन करणाऱ्या पत्रकार संतोष शिराळे यांनी जिल्हाध्यक्ष पदावर न्याय देण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा.अशी अपेक्षा व्यक्त केले. नवनाथ पवार यांनी आभार मानले. सातारा जिल्हा संघटक मिलिंद लोहार यांनी सूत्रसंचालन केले.

———————————-&———
फोटो – पत्रकार संघटनेची निवड झाल्यानंतर सत्कार करताना मान्यवर (छाया-निनाद न्यूज,सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments