ताज्या बातम्या

लाडक्या बहिणीचे पैसे सेंट्रल बँकेने लुटले;मात्र ग्राहक संरक्षण कक्षाने परत मिळवून दिले

प्रतिनिधी(महेश कवडे)  : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने लाटले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे ! शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षामुळे मिळाला लाडक्या बहिणीला न्याय  मिळाला आहे.सौ.लता गौडा यांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेने बँक चार्जेस म्हणून स्वतःच्या खात्यात वळती केले अशी तक्रार शिवसेना भवन येथील मध्यवर्ती कार्यालयात प्राप्त झाली.त्यानुसार कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आज सेंट्रल बँकचे मुख्य प्रबंधक कृष्णकुमार बढाया यांची भेट घेऊन जाब विचारला. बँकेने संपूर्ण रक्कम महिला ग्राहकाला परत करण्याचे आश्वासन या बैठकीदरम्यान श्री बढाया यांनी शिष्टमंडळाला दिले. सदर शिष्टमंडळात खजिनदार देविदास माडये, कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ,कक्ष विधानसभा संघटक बळीराम मोसमकर, कृष्णकांत शिंदे ,कार्यालय चिटणीस सत्यवान फोपे, राजेश चव्हाण,वॉर्ड संघटक संतोष हिनुकले व तक्रारदार सौ लता गौडा उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top