सातारा(अजित जगताप) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या राज्य कार्यकारणीची बैठक सातारा येथे संपन्न झाली. यावेळी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली असून विधानसभेच्या किमान ११ जागेवर मैत्रीपूर्ण निवडणूक लढवावी लागेल .असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केले.
सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेल या ठिकाणी राज्य कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचकावर रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ सरवदे, जितेंद्र बनसोडे , शशिकलाताई वाघमारे ,अशोक बापू गायकवाड व कोल्हापूरचे उत्तम कांबळे पुण्याचे श्रीकांत कदम सांगलीचे राजेंद्र खरात व सोलापूरचे सोमनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक बैठकीला प्रश्नाची विभागणी झाली पाहिजे. महायुती असून सुद्धा काही पक्षांकडून आपल्या नेत्याचे बॅनर वर फोटो लागत नाहीत. ही बाब गंभीर असली तरी महायुतीच्या समन्वय समितीच्या सदस्य बैठकीत आपल्या पक्षाचे प्रतिनिधी काय करतात? असाही त्यांनी माहितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला. कारण या बैठकीला नेत्यांकडून बॅनर मंजूर करून आलेले आहे. असे उत्तर दिले जाते.
लोकसभेला एकही जागा रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला देण्यात आली नाही. परंतु आपण जागा मागितल्याचा पुरावा सिद्ध करू शकलो नाही. आता निवडणूक आयोगाची मान्यता घेऊनच कार्यकर्त्यांनी वागले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
आता फक्त राखीव जागेची मागणी न करता इतर जागी निवडणूक लढवण्याचा निर्णय व अंमलबजावणी रिपोर्ट पक्ष करणार आहे असा ठराव या बैठकीत घेण्यात आला. सर्व जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेतच पण यावेळी पक्षाला डावलण्याचे धाडस जर कोणी केले तर त्यांना योग्य ते उत्तर दिले जाईल.
आज हरियाणा व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लढवण्यास मान्यता मिळालेली आहे .आणि उसासोबत शेतकरी हे चिन्ह आहे.
सध्या रिपब्लिकन पक्षाला शासकीय कमिट्यामध्ये स्थान देण्याचा निर्णय झाला असला तरी अद्यापही आपल्या कार्यकर्त्यांची यादी उपलब्ध झालेली नाही. अशी त्यांनी खंत व्यक्त केली. दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 रोजी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील टोपीचा उल्लेख करावा म्हणजे नेमके किती कार्यकर्ते या मेळाव्याला किंवा वर्धापन दिनाला हजर राहिले हे स्पष्ट होणार आहे सध्या नियमबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असून पक्षाचा निधी व लाभ घेणाऱ्या कार्यकर्ता बैठकीला येत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे संकेत दिलेले आहे.
आता सातारा नंतर पिंपरी चिंचवड कोल्हापूर सांगली सोलापूरला बैठक होणार असल्याची माहिती दिली. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला युवा नेते स्वप्निल गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड ,पूजा बनसोडे, आप्पा तुपे व व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाला मान्यता टिकवण्यासाठी निवडणूक लढवावी लागेल
RELATED ARTICLES