Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्र"एक अक्षरगणेशा रुग्णांसाठी" ; सलग 8 व्या वर्षी डॉ.संदीप डाकवे यांचा उपक्रम

“एक अक्षरगणेशा रुग्णांसाठी” ; सलग 8 व्या वर्षी डॉ.संदीप डाकवे यांचा उपक्रम

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील संवेदनशील अक्षरगणेश कलावंत शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यानी ‘‘एक अक्षर गणेशा रुग्णांसाठी’’ हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडून आपल्या आवडीच्या नावाचा अक्षरगणेशा रेखाटून घ्यायचा त्या बदल्यात त्यांना रु.200/- चे मूल्य द्यायचे आहे. हे मूल्य गरीब, गरजू रुग्णांसाठी देण्यात येणार आहे. यामुळे आपणास अक्षरगणेशा मिळेलच परंतू
गरजूंना मदत केल्याचे समाधानही मिळेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित केला आहे. 7 सप्टेंबरला लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. मंगळवार दि.17 सप्टेंबर, 2024 अखेर हा उपक्रम चालणार आहे. डाॅ.डाकवे यांनी अक्षरगणेशातून मदत केलेल्या उपक्रमाचे हे 8 वे वर्ष आहे. डाॅ.संदीप डाकवे हे गेली सुमारे 19 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रम स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राबवण्यात आला आहे. डॉ.संदीप डाकवे यानी कलेच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त रुपयाची रोख मदत केली आहे. सार्वजनिक मंडळानी अक्षरगणेशा उपक्रम राबवल्यास रुग्णांसाठी भरघोस मदत करता येईल. डॉ.संदीप डाकवे यांनी अक्षरगणेशा व कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मंदीर जीर्णोद्धारासाठी रु.51 हजार, नाम फाऊंडेशनला रु.35 हजार, केरळ पुरग्रस्तांना रु. 21 हजार, विद्यार्थ्यांच्या फी साठी रु.6 हजार, मंदिर, ईर्षाळवाडी आपत्तिग्रस्तांसाठी साठी रु.5 हजार 555, ईशिता पाचुपते रु.5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5 हजार, मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 ला रु.4 हजार, मुख्यमंत्री सहायता निधीस रु.3 हजार, शांताई फौंडेशनला 2 हजार 222, भारत के वीर या खात्यात रु.1 हजार अशी रोख स्वरुपात मदत केली आहे. या बरोबरच डॉ.डाकवे यानी एक लाखाहून जास्त किमतीचे शैक्षणिक साहित्य विविध शाळांना दिले आहे. अर्थात हे सर्व लोकसहभागातून केले असल्याचे डाॅ.संदीप डाकवे हे जाहीररीत्या कबूल करतात.
“एक अक्षरगणेशा रुग्णांसाठी” या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे.

चौकटीत : डॉ.संदीप डाकवे यांच्या अक्षर गणेशा उपक्रमाचे कौतुक :

डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेल्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये एकदा तर वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड बुक मध्ये दोनदा झाली आहे. याशिवाय इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी 30 पेक्षा जास्त स्पेशल रिपोर्ट तर सहयाद्री दूरदर्शन वाहिनीवर अर्ध्या तासाची मुलाखत प्रसारित केली आहे. डॉ.संदीप डाकवे यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी 75 पेक्षा जास्त तर महाराष्ट्र शासनाने 6 पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments