Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रअवयवदान चळवळ इतकी फोफावली पाहिजे की भारतातून नेत्रांची निर्यात होऊ शकेल ;...

अवयवदान चळवळ इतकी फोफावली पाहिजे की भारतातून नेत्रांची निर्यात होऊ शकेल ; प्रा. सौ. नयना रेगे यांनी व्यक्त केला निर्धार

प्रतिनिधी : आजच्या तारखेला श्रीलंकेसारखा आपल्यापेक्षा कितीतरी लहान असलेला देश भारतासारख्या महासत्तेकडे झेपावणाऱ्या देशाला नेत्रांची निर्यात करतो. आपल्या देशात अवयवदानाचे महत्त्व सर्वांना पटवून देत ही चळवळ इतक्या जोमाने फोफावली पाहिजे की भविष्यात भारतातून नेत्रांची निर्यात करता आली पाहिजे, अशी ‘नेत्र’दीपक कामगिरी करण्याचा निर्धार या चळवळीतील क्रीयाशील कार्यकर्त्या प्रा. सौ. नयना रेगे यांनी बोलून दाखविला. जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्ताने पर्व शैक्षणिक धर्मादाय संस्थेच्या वतीने अवयव दान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचा शुभारंभ प्रा. सौ. नयना रेगे यांनी अवयव दानाचे महत्त्व कथन करून करण्यात आला. त्यांनी लोकांचा गैरसमज दूर करणारी काही उदाहरणे सुद्धा सांगितली. या सप्ताहात महाराष्ट्राच्या विविध भागांत १८ ठिकाणी अवयवदान माहिती प्रचार आणि प्रसार ऑनलाईन केंद्र नागरिकांकरीता खुली होणार आहेत. या अवयव दानाच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ROTTO, SOTTO या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य समुपदेशक सुजाता अष्टेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संस्थेचे मुख्य सल्लागार विजय वैद्य आणि विश्वस्त सौ. वैशाली वैद्य, प्रविण वराडकर यांच्या समवेत पर्व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून महाराष्ट्र व्यापी अवयवदानचळवळ होणार असल्याचे विजय वैद्य आणि प्रवीण वराडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments