दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ?
प्रतिनिधी(मंगेश कवडे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
केव्हा होणार परीक्षा?
- बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे.
- दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा :
- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी, 2025 ते मंगळवार, दि. 18 मार्च 2025
- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार, दि. 24 जानेवारी 2025 ते सोमवार, 10 फेब्रुवारी 2025
- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा : शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी, 2025 ते सोमवार दि. 17 मार्च, 2025
- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : सोमवार, 03 फेब्रुवारी 2025 ते गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025 सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर होणार
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.. मंडळानं दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या 23 ऑगस्ट पर्यंत कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.