ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

सरकारच्या खोट्या आश्वासना विरोधात अंगणवाडी सेविका मदतनीस पुन्हा आझाद मैदानात

मुंबई (रमेश औताडे) : राज्यातील एक लाख १५ हजार अंगणवाडी केंद्रातील सेविकांना व मदतनीस यांना सरकारने ५ हजार रुपये वाढीव देण्याचे आश्वासन मागील अधिवेशन काळात दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप केली नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करण्यास उतरल्या आहेत.

अंगणवाडी केंद्रातील मुलांची काळजी घेऊन झाल्यावर त्यानंतर आम्ही आंदोलन करत आहोत. आम्हालाही मुलांची काळजी आहे. मात्र सरकारला या अंगणवाडी बहिणीची काळजी नाही. असा आरोप करत सोमवारी भर उन्हात छत्री घेऊन आंदोलन सुरू केले आहे.

आशा सेविकांना पाच हजार वाढ केली मग आम्हाला का नाही ? १९७२ साली स्थापन झालेल्या अंगणवाडी सेविकांना आपल्या मागण्यासाठी आजही आंदोलन करावे लागत आहे. सरकारची १२ ते १३ प्रकारची समाज उपयोगी करायची, उन वारा पाऊस बाराही महिने सरकारी महिला कर्मचारी प्रमाणे काम करायचे मग वेतनात फरक का ? आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना जेवण करायला वेळ नाही. त्यामुळे सरकारने आता या धरणे आंदोलनाला न्याय दिला नाही तर यापुढे बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Scroll to Top