ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक साद

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा शेवट अत्यंत भावनिक आणि नाट्यमय पद्धतीने करत, आपल्या नेतृत्वावर आरोप होत असतील आणि शिवसैनिकांना ते खरे वाटत असतील तर आपण कोणत्याही क्षणी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार असल्याचे जाहीर केले.
“माझ्या जागी एखाद्या सामान्य शिवसैनिकाला पक्षप्रमुख करा. मला नेतृत्वाची कोणतीही हाव नाही. मी मुख्यमंत्रिपद सोडताना देखील पदाला चिकटून राहिलो नव्हतो,” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना विचारपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहातील शिवसैनिकांनी उभे राहून जोरदार घोषणाबाजी करत त्यास विरोध दर्शविला.
भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले काही खासदार दुसऱ्या पक्षात जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्यावर “गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही,” अशा शब्दांत निशाणा साधला.
धाराशिवमधील एका शेतकऱ्याने निवडणुकीसाठी मदत म्हणून आपला पैशांचा बटवा दिल्याचा प्रसंग सांगत, सामान्य जनतेच्या विश्वासाच्या बळावर महाविकास आघाडीने निवडणूक जिंकली असल्याचे त्यांनी म्हटले. “आज तेच खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर हे पाप कुठे फेडणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, “आम्ही ३० वर्षे भाजपसोबत राहूनही त्यांच्यात विलीन झालो नाही, मग काँग्रेसमध्ये कसे विलीन होणार?” असे सांगत त्यांनी उलट भाजपच भविष्यात शिंदे सेनेत विलीन होईल का, असा टोला लगावला.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यभर फिरत नाहीत, या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. “मी सभा घेतल्या नसत्या, जनतेत गेलो नसतो तर नऊ खासदार निवडून कसे आले असते?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ठाकरे कुटुंबावर सातत्याने होत असलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त केली.
भाजपने २०१९ मध्ये दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली, असे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. “मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं आणि सगळी पदे आम्हीच घ्यायची, अशी काहींची मानसिकता होती,” असे ते म्हणाले.
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीवरील विश्वास कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली. “भाजपची वाटचाल ‘वन पार्टी, नो इलेक्शन’च्या दिशेने सुरू आहे. मात्र, हीच वाट कायम राहिली तर त्यांची सत्ता दीर्घकाळ टिकणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपद सोडण्याच्या विधानामुळे ठाकरे गटात संघटनात्मक बदल होणार का, तसेच पक्षाच्या नव्या बांधणीसाठी हा डाव गेमचेंजर ठरणार का, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

Scroll to Top