भोसे (रविकांत बेलोसे) : पांचगणी हे जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. इंग्रजांच्या काळापासून आपले अस्तित्व निर्माण करून असणाऱ्या अनेक शाळा बदलाच्या ओघात लोप पावल्या. परंतु अनेक संकटांचा सामना करीत आजही दर्जेदार शिक्षण देत संजीवन विद्यालयाने आपली वेगळी ओळख जगभरात निर्माण केली असल्याचे प्रतिपादन ॲड. जयंत गायकवाड यांनी केले.

पांचगणी (ता. महाबळेश्वर) येथील संजीवन विद्यालयाचा १०२ वा वर्धापन दीन विविध उपक्रमांनी साजरा झाला. यावेळी ॲड. जयंत गायकवाड बोलत होते. यावेळी श्री. किशोरभाई व्होरा, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, प्रवीण बोधे, अधिवक्ता जयंत गायकवाड, दीपक फडणीस, ससंक कर्णिक, श्रीमती कीर्ती मानकर, रमाकांत भिंगार्डे, किशोरभाई पुरोहित, बोडस आजी,
श्री अमोग अदिगे तसेच संस्थेच्या विश्वस्त, अध्यक्ष शशिताई ठकार, विश्वस्त अनघा देवी,
अविनाश अडिगे, उमेश त्रिवेदी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक किशोर भाई पुरोहित, मीनाक्षी बोडस, किशोर व्होरा यांचा यावेळी सन्मानचिन्ह , शाल श्रीफळ देवून विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तर शालेय मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. शशिताई ठकार यांनी सर्वांचे स्वागत केले.
१०२ वर्षात शाळेने अनेक चढ उतार अनुभवले असून या धकाधकीच्या काळातही संस्थेने आपली कमान नेहमी उंचावत ठेवली आहे. त्यामुळे संजीवन चा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा शशी ताई ठकार यांनी व्यक्त केली.
संजीवन विद्यालयाने पाचगणीच्या नावलौकिकात आपला वेगळा ठसा उमटवला असून पाचगणीकर नागरिक माजी विद्यार्थी आणि शाळा प्रशासन यानी एकत्र येवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा आपला वसा कायम ठेवावा. यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकारी करू असे आश्वासन माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी दिले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री. देशमुख साहेब, धनंजय शिरूर ,नेहा शहा,क्लॅरिस्टा डिसिल्वा
आकांक्षा बोंगाळे, तसेच शाळेचे विद्यार्थी, पालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. क्लॅरिस्टा डिसिल्वा यांनी सूत्रसंचालन केले तर श्री देशमुख यांनी आभार मानले.
सोबत फोटो आहे
पांचगणी : शाळेच्या वतीने पुरस्कार देवून किशोर भाई पुरोहित यांचा सन्मान करताना शशीताई ठकार शेजारी लक्ष्मी कऱ्हाडकर, प्रवीण बोधे व इतर (रविकांत बेलोशे सकाळ छाया चित्र सेवा)