ताज्या बातम्या
नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करा; जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्याची गरज! वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनहिताच्या भूमिकेचे कौतुक; नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहनदुष्काळग्रस्तांना ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच; कराडचा दुष्काळ यादीत समावेश काँग्रेसच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच – बाबुराव पवारमहापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी केली नवी मुंबई महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणीभिवंडीत एसआयआर प्रक्रियेत ४९ टक्के मतदारांची नावे वगळली! आमदार रईस शेख यांचा गंभीर आरोप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारपाचुपतेवाडीत साठवण तलावाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत आक्रमक; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा!

नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करा; जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्याची गरज! वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनहिताच्या भूमिकेचे कौतुक; नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नवी मुंबई(भीमराव धुळप) : नवी मुंबईचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नेहमीच जनतेला विश्वासात घेऊन दिलेला शब्द पाळण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळेच नवी मुंबईतील नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जाते. ते जे बोलतात, ते करून दाखवतात, अशी त्यांची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे.
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि मोरबे धरणातील पाण्याचे इतर शहरांना होणारे वितरण या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही बाब गंभीर असून, नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळणे आवश्यक आहे. ‘नवी मुंबईकर हा माझा श्वास आहे,’ ही गणेश नाईक यांची भावना त्यांच्या शहराप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीव करून देते.
स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधांच्या बाबतीत नवी मुंबईने देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आतापासूनच ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील जुन्या विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती व पुनर्जीवन करावे. मोठ्या इमारतींचे बांधकाम, स्विमिंग पूल, वाहन धुलाई तसेच इतर कामांमध्ये पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. पाणीचोरी होत असल्याच्या तक्रारींचीही गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने नियंत्रण आणावे.
वारंवार होणारी पाणीकपात, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि नागरिकांना पुरेसे पाणी न मिळण्याच्या समस्येवर महापालिका प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा. पावसाचे पाणी साठवणे, जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन यांसारख्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे.
पाणी ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी!
एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की, नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत. तसेच नवी मुंबईकर नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळ उघडे ठेवू नयेत, गळती त्वरित दुरुस्त करावी आणि पाण्याचा अपव्यय टाळावा.
आज पाण्याचे संवर्धन केले, तरच उद्याच्या पिढीला पुरेसे पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करून नवी मुंबईतील पाणीसमस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.

Scroll to Top