ताज्या बातम्या
नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करा; जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्याची गरज! वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनहिताच्या भूमिकेचे कौतुक; नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहनदुष्काळग्रस्तांना ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच; कराडचा दुष्काळ यादीत समावेश काँग्रेसच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच – बाबुराव पवारमहापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी केली नवी मुंबई महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणीभिवंडीत एसआयआर प्रक्रियेत ४९ टक्के मतदारांची नावे वगळली! आमदार रईस शेख यांचा गंभीर आरोप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारपाचुपतेवाडीत साठवण तलावाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत आक्रमक; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा!

दुष्काळग्रस्तांना ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच; कराडचा दुष्काळ यादीत समावेश काँग्रेसच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच – बाबुराव पवार

कराड : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२च्या आधारे जाहीर केलेल्या अंतिम दुष्काळी तालुक्यांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ तालुक्यांचा समावेश केला आहे. मात्र, कराड तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश होण्यासाठी काँग्रेस पक्षाला सातत्याने संघर्ष करावा लागला. सत्ताधारी भाजपा चे तीन आमदार असतानाही कराडचा सुरुवातीच्या दुष्काळी यादीत समावेश झाला नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे, अशी घणाघाती टीका कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष बाबुराव पवार यांनी केली.

कराड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता असतानाही सरकारने सुरुवातीला तालुक्याला दुष्काळाच्या यादीपासून वंचित ठेवले. त्यावेळी काँग्रेस पक्षाने केवळ कार्यालयात बसून राजकारण केले नाही, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि दुष्काळाची वास्तविक परिस्थिती जाणून घेतली. या पाहणीत कराड तालुक्यातील अनेक भागांमध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला. मंडलनिहाय सर्वेक्षण करून वस्तुस्थितीच्या आधारे कराड तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. सरकारकडून अपेक्षित हालचाल न झाल्याने तहसीलदारांना निवेदन देत जनआंदोलन, उपोषण आणि तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

काँग्रेसच्या सातत्यपूर्ण आंदोलनाचा आणि शेतकऱ्यांच्या रोषाचा धसका घेत अखेर सरकारला कराड तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा लागला, असा दावा बाबुराव पवार यांनी केला.

मात्र, दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. वाढलेला उत्पादन खर्च, बियाणे, खते, औषधे, मजुरी, सिंचनाचा खर्च आणि पिकांचे झालेले नुकसान पाहता ५ हजार रुपये ही मदत नसून शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा आहे, असा संताप बाबुराव पवार यांनी व्यक्त केला.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असताना सरकारने ५ हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करू नये. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन भरीव आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि इतर आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

सातारा जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट झाले असले तरी फक्त कागदावर दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात पुरेशी मदत जमा झाली पाहिजे. सरकारने आता घोषणांचा खेळ बंद करून प्रत्यक्ष मदत देण्याची वेळ आली आहे.

कराड दुष्काळ दिसतच नव्हता

काँग्रेसने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तो सरकारला दाखवून दिला. आता ५ हजारांची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सन्मानजनक आणि पुरेशी मदत द्या,” असा इशारा बाबुराव पवार यांनी दिला.

Scroll to Top