पुणे(अजित जगताप) : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे विभागात सध्या प्रस्थापित पक्ष व घराणेशाही विरोधात सामान्य शिक्षक व पदवीधर यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात रान पेटवले आहे. आता निकालाबाबत काही ठिकाणी तोंडी पैजा लागल्या आहेत. निवडणुका म्हटलं की, प्रस्थापित उमेदवारांच्या समर्थकांकडून पोकळ पाठिंबापेक्षा भरीव नाराजी निकालाचे चित्र पलटून टाकण्यास कारणीभूत ठरतील. असा विश्वास काही अपक्ष उमेदवार सुद्धा मत व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दुष्काळी परिस्थितीवर उपाय योजना करण्याऐवजी राजकारणाची धुळवड सुरू आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सामान्य शेतकरी संघटना व कार्यकर्ते झटत आहेत. पण सत्ताधारी व विरोधकांना त्याचं काही देणे-घेणे राहिले नाही. याचा फटका निवडणूक निकालाबाबत स्पष्ट होणार आहे. असे भाकीत वर्तवले जात आहे. पुणे विभागात सातारा- सांगली- पुणे- सोलापूर व कोल्हापूर हे पाच जिल्ह्यातील शिक्षण संस्था व पदवीधर मतदार मतदानासाठी प्रात्यक्षिक करत आहेत. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी ऐतिहासिक ठरली आहे. सत्तेचा कितीही वापर केला? पक्षीय विरोध केला? तरी शासकीय पदवीधर व शिक्षक यांच्यामध्ये चांगली जागरूकता निर्माण झाली आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी येत्या शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी संत बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे. मंगळवार दि: २७ ऑक्टोबर रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे झालेल्या मतदानानंतर पारदर्शकपणाने मतमोजणी होणार आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून ४७, तर शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रस्थापित पक्ष व घराणेशाहीचे उमेदवारांच्या विरोधात सामान्य कुटुंबातील ही शिक्षक व पदवीधर रणांगणात उतरले आहेत. त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा हा लोकशाही वरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. क्रांती करण्यासाठी प्रस्थापितांना धडा शिकवावा. यासाठी शिक्षक व पदवीधरच हातामध्ये स्वाभिमानी व हक्काचा अंकुश घेऊन उभे राहिले आहेत.
दरम्यान पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघातील मतदानासाठी शासकीय यंत्रणा सक्षमरीत्या काम करत आहे. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली आहे. पदवीधर मतदार संघात पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ३ लाख ८८ हजार मतदार असून, त्यांच्यासाठी ७४१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी ६२ हजार मतदार असून, त्यांच्यासाठी ३१० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे दोन्ही मतदारसंघांत मिळून सुमारे ४ लाख ५० हजार मतदार १,०५१ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे विभागातील शिक्षक व पदवीधरांच्या समस्यांबाबत समाधानकारक उपाययोजना आतापर्यंत झाली नाही. ही भावना मतदारांच्या मनामध्ये घट्ट चिटकून राहिले आहे. ही उमेदवारी करणाऱ्या प्रस्थापितांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. शिक्षक व पदवीधर मतदार संघाने प्रस्थापित उमेदवारांना नाकारल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले. हे आता स्वीकारावे लागत आहे. अनेक ठिकाणी नाराजीचे चित्र दिसत असले तरी त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक रंगभरणी केली जात नाही. एकतर्फी प्रेमासारखीच गोष्ट मतदार समजून घेत आहेत. याबाबतची प्रतिक्रिया मतमोजणी मध्ये दिसून येणार आहे. पदवीधर मतदारसंघात विक्रमी ७५ उमेदवारांनी ८७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. २३ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. किमान लाखभर मतांना प्रस्थापितांना उमेदवारांना कळत नकळत मुकावे लागणार आहे.
पुणे विभागात शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ४९ उमेदवारांनी ६७ नामनिर्देशनपत्रे दाखल केले होते. ३७ जणांनी माघार घेऊन काहींनी उघडपणाने प्रस्थापितांना नाकारले आहे. महाविकास आघाडी असो किंवा महायुती पुणे विभागातील शिक्षक व मतदारांमध्ये चांगलीच जागरूकता निर्माण झाली आहे.
दोन्ही मतदारसंघांतील मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा. मतदान करताना मतपत्रिकेवरील सूचनांचे पालन करून आपले मत वैध राहील, याची मतदारांनी काळजी घ्यावी. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने सक्रिय सहभाग नोंदवावा. कोणतेही भूल थापा अथवा राजकीय दबावाला बळी न पडता सक्षम उमेदवारांना मतदान करून एक नंबरचे काम करावे. दोन नंबरचे काम करणाऱ्यांना धडा शिकवावा. असे थोडक्यात या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा राबत आहे. दरम्यान, दोन्ही मतदारसंघात फुटाफुटीचे ग्रहण लागले असून काही प्रस्थापितांचा आत्मविश्वास ढळू लागल्याची चर्चा सुरू झालेली आहे. समाज माध्यमावर या प्रचारामुळे समाज माध्यमाची ताकद वाढली असल्याचे कबूल केले गेले आहे.




