ताज्या बातम्या
नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करा; जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्याची गरज! वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनहिताच्या भूमिकेचे कौतुक; नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहनदुष्काळग्रस्तांना ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच; कराडचा दुष्काळ यादीत समावेश काँग्रेसच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच – बाबुराव पवारमहापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी केली नवी मुंबई महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणीभिवंडीत एसआयआर प्रक्रियेत ४९ टक्के मतदारांची नावे वगळली! आमदार रईस शेख यांचा गंभीर आरोप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारपाचुपतेवाडीत साठवण तलावाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत आक्रमक; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा!

महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी केली नवी मुंबई महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणी

नवी मुंबई : गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देताना शैक्षणिक सुविधांच्या पूर्ततेकडेही विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील स्थिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरूवात केली असून त्यांनी घणसोली, कोपरखैरणे, वाशी विभागातील काही शाळांना भेट दिली आणि मौलिक सूचना केल्या.

या पाहणी दौ-यात त्यांच्यासमवेत शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी श्री. अशोक कडूस उपस्थित होते. शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांनीही या शाळा पाहणी दौ-यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये महापौरांनी शाळांच्या इमारतींची पाहणी करून शाळांमधील पायाभूत सुविधा, आवश्यक सोयीसुविधा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती जाणून घेतली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नमुंमपा शाळा क्र. ५५, कातकरीपाडा, रबाळे येथील शाळा इमारतीच्या पाहणीने दौ-यास सुरूवात झाली. यावेळी माजी महापौर व विद्यमान नगरसेवक श्री.सुधाकर सोनवणे यांच्यासमवेत महापौरांनी इमारतीची पाहणी केली आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शाळेतील विविध समस्या व आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

पुढे नमुंमपा शाळा क्र. ७४, कोपरखैरणे येथील शाळेच्या इमारतीची पाहणी करण्यात आली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शाळेच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी तसेच आवश्यक सुविधांबाबत माहिती घेण्यात आली. यावेळी नगरसेवक श्री. शिवराम पाटील, श्री. शिरीष पाटील, श्रीम.मीनाक्षी पाटील उपस्थित होते.

नमुंमपा शाळा क्र. २७, वाशीगांव येथील शाळेचीही महापौरांनी पाहणी केली आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच शाळेतील विविध समस्या व आवश्यक सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली. याप्रसंगी नगरसेवक श्री. निशांत भगत, श्रीम. प्रिती भगत उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून शाळांमधील सद्यस्थिती, पायाभूत सुविधांची आवश्यकता आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यावर भर देण्यात आला. शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक चांगले होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी शाळांच्या समस्यांची माहिती घेणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगत या माध्यमातून नवी मुंबई शिक्षण व्हिजन अधिक सक्षम होईल असा विश्वास महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी व्यक्त केला.

Scroll to Top