ताज्या बातम्या
नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करा; जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्याची गरज! वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनहिताच्या भूमिकेचे कौतुक; नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहनदुष्काळग्रस्तांना ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच; कराडचा दुष्काळ यादीत समावेश काँग्रेसच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच – बाबुराव पवारमहापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी केली नवी मुंबई महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणीभिवंडीत एसआयआर प्रक्रियेत ४९ टक्के मतदारांची नावे वगळली! आमदार रईस शेख यांचा गंभीर आरोप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारपाचुपतेवाडीत साठवण तलावाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत आक्रमक; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा!

भिवंडीत एसआयआर प्रक्रियेत ४९ टक्के मतदारांची नावे वगळली! आमदार रईस शेख यांचा गंभीर आरोप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. या प्रक्रियेत तब्बल ४९ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत, संबंधित मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी (१५ ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शेख यांनी सादरीकरणाद्वारे या प्रकरणातील कथित अनियमिततांचे पुरावे मांडले. त्यांच्या माहितीनुसार, एसआयआर प्रक्रियेपूर्वी भिवंडी पूर्व मतदारसंघात ३ लाख ७६ हजार १३८ मतदार होते. त्यापैकी १ लाख ९१ हजार ९७ मतदारांचे मॅपिंग झाले असून, १ लाख ८४ हजार ७१६ मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला.
स्थानिक रहिवाशांना कायमस्वरूपी स्थलांतरित दाखवणे, नोंदणी अर्ज भरूनही नावे वगळणे आणि बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून अर्ज गहाळ होणे, अशा तक्रारी त्यांनी मांडल्या. तसेच अर्ज क्रमांक ७ चा गैरवापर करून मुस्लिम, दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय मतदारांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदारांना त्यांच्या नावाची स्थिती तपासता यावी, यासाठी संकेतस्थळ विकसित केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच वगळलेली पात्र मतदारांची नावे पुनर्स्थापित करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे उपमहापौर तारीक मोमीन, पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. आमदार शेख यांनी केलेले आरोप हे त्यांचे दावे असून, त्यांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.

Scroll to Top