मुंबई (शांताराम गुडेकर ) : पुणे जिल्ह्याचे अधिकृत नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा’ असे करण्यात यावे, या मागणीसाठी आंतराष्ट्रीय छत्रपती शिवशंभू राजे प्रचार प्रसार समिती व भारतीय महाक्रांती सेना यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत यांना निवेदन सादर करण्यात आले.
डॉ.अविनाश धनंजय सकुंडे यांनी मा.
उदय सामंत यांची भेट घेऊन पुणे जिल्ह्याचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा’ करण्याची मागणी करत निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व स्वराज्याशी असलेल्या अतूट नात्याचा उल्लेख केला.
ऐतिहासिक व वैशिष्टयपूर्ण स्थान पुणे जिल्हा हा मराठा इतिहासाचा एक महत्वाचा केंद्रबिंदू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाशी, जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारांशी आणि स्वराज्याच्या प्रारंभाच्या इतिहासाशी त्याचा थेट संबंध आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे नमूद केले.
या नामांतरामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव होईल, स्वराज्याचा इतिहास जतन होईल आणि भावी पिध्यांमध्ये ऐतिहासिक अभिमान जागूत होईल. शासनाने या मागणीचा सकारासक विचार करून आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया लवकर सुरू करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवशंभू राजे प्रचार प्रसार समिती,भारतीय महाक्रांती सेना,पुणे जिल्ह्याचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा असे करावे ही आमची मागणी आहे.
मागणीची प्रमुख मुद्दे
————————–
पुणे जिल्ह्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व स्वराज्याशी असलेले अद्वीतीय नांते लआत घेऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा’ असे नामांतर करावे.
पुणे जिल्ह्याच्या इतिहासास अनुरूप असा हा निर्णय पुणेकरांच्या स्वाभिमानचा व भावनांचा आदर करणार ठरेल.
या नामांतरामुळे नव्या पिढीत ऐतिहासिक अभिमान, राष्ट्रभकी व स्वराज्याची प्रेरणा निर्माण होईल.शासन, प्रशासन व सर्व संबंधित विभागांनी या मागणीचा सकारासक विवार करून आवश्यक प्रक्रिया सुरू करावी.डॉ.अविनाश धनंजय सकुंडे संस्थापक अध्यक्ष :-आंतरराष्ट्रीय स्तीति प्रचार प्रसार समिती राष्ट्रीय अध्यक्ष -भारतीय महाक्रांती सेना यांनी
शिवरायांचा पुण्यभूमीचा सन्मान, हीच आमची मागणी असल्याचे नमूद केले.
पुणे जिल्ह्याचे ‘छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा’ असे नामकरण करण्याची मागणी करत मा. उदय सामंत यांना निवेदन सादर करताना डॉ. अविनाश सकुंडे आणि कार्यकर्ते




