ताज्या बातम्या

पुणे पदवीधर फक्त निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची प्रक्रिया

सातारा(अजित जगताप) : प्रत्येक निवडणूक ही लोकशाही मोहीम ज्योत तेवीत ठेवण्याची निरंतर प्रक्रिया आहे. पण, यंदाची पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही लोकशाही मोहीम वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उच्चविद्याविभूषित सातारा जिल्ह्याचे स्वाभिमानी महाविकास आघाडीची उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव यांना सामान्य पदवीधरांचा पाठिंबा मिळत आहे. ही निवडणूक सत्ताधारी- पोलीस व प्रशासनाच्या अडून हुकूमशाही-धन दांडग्यांची घुसखोरी व सत्याग्रह दुर्लक्षित करणाऱ्या प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आहे. असे परखड मत प्रचारानिमित्त पदवीधर मतदारच व्यक्त करत आहेत. पुणे विभागातील जागृत पदवीधरांच्या सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले साठ वर्षापासून फक्त पदवीधरांनी मतदान केले . याव्यतिरिक्त या दोन जिल्ह्यांना कधीही पदवीधर मतदार संघातून संधी मिळाली नाही. आज महाविकास आघाडीकडे विजयश्री खेचून आणणारी हर्षदा देशमुख- जाधव सारखी संयमी व सामान्य चेहरा असलेली उमेदवारी मिळाली आहे. अर्धी लढाई त्यामुळेच जिंकण्याचाच अनुभव प्रचारक घेत आहेत. आज पुणे विभागात निवडणुकीचे वातावरण पाहता पदवीधरांच्या सदविवेकबुद्धीतून केलेल्या आंदोलनातून परिवर्तनाची नांदी दिसू लागलेली आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर नगरीमध्ये सुद्धा सत्ताधाऱ्यांनी विरोधात क्रांतीची मशाल पेटवली गेली आहे. कोल्हापूर मधून मोठ्या प्रमाणात भाजपाविरोधी सुप्त लाट दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातही सत्ताधारी भाजप विरोधी वातावरणामुळे मंत्र्यांना सुद्धा पुणे- नवी दिल्ली येथील आंदोलनाची नोंद घ्यावी लागत आहे. हीच खरी जिवंत लोकशाहीचे लक्षणे आहेत. महाविकास आघाडीच्या सुशिक्षित व चेहऱ्यावर नम्रता भाव असलेल्या उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव यांनी जेष्ठ कार्यकर्ते तसेच पदवीधर यांच्याशी संवाद साधून त्यांची मन जिंकले आहेत. ही निवडणूक आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांपेक्षाही पदवीधरांनीच हाती घेतली आहे. पदवीधरच आपल्या परीने इतर पदवीधरांना सक्षम उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव यांना पसंतीची मते देण्यासाठी प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. देशभरात विकाऊ मीडिया आणि टिकाऊ मतदार अशी उभी फूट दिसून आली आहे. गोदी मीडिया चले जाऊ चा नारा होत आहे. यामध्ये नेहमीच टिकाऊ विचार यशस्वी ठरतात. हेच आता पुणे विभागातील पदवीधर दाखवून देणार आहेत. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या अनुषंगाने व्यक्तिगत पातळीवर पदवीधरांच्या गाठीभेटी सुरू आहेत. सकाळी सातारा बस स्थानकात नोकरी व्यवसायासाठी मजबुरीने सातारा येथून हिंजवडी- पुणे येथे जाणाऱ्या मतदार असलेल्या पदवीधरांशी संपर्क साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट व डाव्या विचाराचे कार्यकर्ते पदवीधरांच्या समवेत गाठीभेटी घेत आहेत. इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय विद्यार्थी चळवळीतील सक्रिय सहभाग असणारे पदवीधर व द्विपदवीधरांनी आपल्या मताचा अधिकार बजावण्यासाठी आतापासूनच जनजागृती सुरू केली आहे. मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी आता पदवीधर वैचारिक भूमिका घेत आहे. सत्ताधारी पक्षातून आलेल्या अन्यायाचा अनुभव आता मतपत्रिकेद्वारे प्रकट होणार आहे. सध्या महा विकास आघाडीच्या प्रचारानिमित्त ग्रामीण भागात पदवीधर मतदारांची नाळ असलेले नेते आदरणीय माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, प्रवीण धसके, शफिक शेख, प्रशांत जाधव, शामराव चिंचणे, विजय पवार, शेतकरी संघटनेचे राजू शेळके, विशाल भोसले, समीर घाटगे, राजकुमार पाटील, नरेंद्र देसाई, असलम तडसरकर , जयवंत निकम, जयश्री कुलकर्णी, नम्रता गोडबोले, सीमा जोशी, एकनाथ कांबळे, समिंद्राताई जाधव, राजश्री पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी तसेच सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे येथील महाविकास आघाडीचे प्रमुख प्रचार समन्वयातून विधारांच्या गाठीभेटी घेत आहेत. ही लढाई ससा विरुद्ध कासव याची पुनरावृत्ती पुणे विभाग पदवीधर मतदार संघात दिसू देणार आहे. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Scroll to Top