सोलापूर(अजित जगताप) : लोकशाहीमध्ये आपल्या विचारांना समर्थन देणाऱ्यांसाठी निवडणूक म्हणजे एक चांगले अस्त्र आहे. परंतु त्याचा वापर आपल्या राजकीय खेळासाठी केला जात आहे. हे दुर्दैव आहे. श्री दुर्गा मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त अनेक पदवीधर माता- भगिनी पूजाअर्चा करत आहेत. नवस म्हणून पायात चप्पल घालत नाहीत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पदवीधर पुणे विभागाचे उमेदवार श्री महारुद्र तिकुंडे यांनी नऊ प्रश्न मांडले आहेत. या नऊ प्रश्नांची सोडवणूक सत्ताधाऱ्यांना करता आलेली नाही. आता त्यांच्या नाकर्तेपणाची ही चप्पल लोकशाहीच्या सर्व दिवसांसाठी बाजूला ठेवली पाहिजे. अशी आता चर्चा सुरू झालेली आहे .आज काही प्रस्थापित घराण्यातील धनदांडग्यांचे समर्थक सुपारी बहादर व पक्ष बदलू बगलबच्चे करीत आहेत. राजकीय प्रवासात पक्षीय निष्ठा आणि स्वाभिमान राजकीय पक्षाकडे गहाण ठेवत आहेत. अशा लोकांना घेऊन पाठिंब्याचे चित्र निर्माण करत आहेत. हेच हास्यास्पद आहे. आज घटस्थापना दिवस असताना शक्ती- समृद्धी आणि स्वच्छ भविष्याची ऊर्जा देणाऱ्या देवीसाठी अनेक जण प्रार्थना करत आहे. लोकशाहीच्या मंदिरातही मनोभावे अशी प्रार्थना केली जात आहे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील पदवीधरांचे नेतृत्व करणारे श्री महारुद्र तिकुंडे यांनी पदवीधर मतदारांच्या संमतीने नऊ संकल्प जाहीर केला आहे.
त्यामध्ये सत्ताधारी व विरोधकांनी न मांडलेला एम.पी.एस.सी. नेट परीक्षा तत्सम स्पर्धा परीक्षा पेपर फोडणाऱ्यांना अध्यक्ष, संचालक, संस्था चालक, व्यक्तींवर मोक्का अतर्गत गुन्हे दाखल करणार.. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार…
कष्टकरी शेतमजूर, शेतकरी, दिन -दलित व सामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची फी माफ करणार…. स्पर्धा परीक्षा रद्द झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देणार…
एम.पी. एस.सी. / यू.पी.एस. सी / नीट, सीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई देणार…
पदवीधर / पदवीत्तर विद्यार्थ्यांना/ बेरोजगारांना गुणवत्तेनुसार नोकरी व्यवसाय मिळेपर्यंत दहा हजार रुपये भत्ता देणार…
सुशिक्षित बेरोजगार युवकांना विना तारण – विना जामीन त्वरित कर्ज वितरण करणार…
पेपर फुटी मुळे आंदोलन करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार ….
विविध शासकीय कार्यालयामधील खाजगीकरण / कंत्राटी पद्धत बंद करून सरळ सेवा भरती करण्यात येणार… हे महत्त्वाचे नऊ संकल्प आहेत. पदवीधरांच्या जीवनातील परिवर्तन घडवणारे हे नऊ प्रश्न निकाली काढण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवणार असे प्रतिपादन पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील उमेदवार श्री महारुद्र तिकुंडे यांनी विविध ठिकाणी घेतलेल्या मतदारांच्या भेटी प्रसंगी केले आहे. पदवीधर मतदारांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात प्रस्थापित उमेदवारांबाबत प्रचंड नाराजी आहे. सत्ता असताना त्यांना पदवीधरांचे प्रश्न मांडता आले नाहीत. त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांच्या प्रचारकांना तुम इधर उधर की बात मत कर… कापीला क्यू लुटा.. उसका जवाब दो.. असे आता पदवीधरच प्रश्न विचारू लागलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवणारी ही निवडणूक रॅली, मेळावा, शक्तीप्रदर्शनाने होऊ शकत नाही. ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे. ती मंडळी धनशक्तीचा प्रदर्शन भरून काही मतदारांना आकर्षित करण्यासाठी आयडिया लढवत आहे. ही आता जुनी पेन्शन सारखीच जुनी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे सुज्ञ पदवीधर मतदारांनी ४० क्रमांकावरील श्री महारुद्र तिकुंडे यांच्या नावासमोर पसंतीचे फक्त एक नंबर लिहून आपल्या लोकशाहीतील कर्तव्य पार पाडावे. अशी अपेक्षा अनेक पदवीधर मतदारांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समोर केली आहे. सध्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा असा पाच जिल्ह्याचा मतदारसंघ असून आत्तापर्यंत राजकीय पक्षांनी कोल्हापूर व पुणे आणि सांगली जिल्ह्याला प्राधान्य दिले आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या क्रांतिकारक सातारा जिल्ह्याच्या भूमिपुत्राला पदवीधर मतदार संघात न्याय देऊन आपले नऊ प्रश्न दुर्गादेवीच्या साक्षीने सोडवून घ्यावेत. असे नम्र आवाहन पदवीधर संघटनेचे कार्याध्यक्ष तथा पदाधिकारी शिवाजी जाधव, लक्ष्मण कदम, गुलाब बनसोडे, मोहन शिंदे, कैलाश कुंभार, मोहन जाधव व पदवीधर तरुणांनी केली आहे. या प्रचार दौऱ्यामध्ये राजकीय पक्षाच्या जाहीरनामा वचन नामाला कंटाळलेल्या पदवीधरांनी श्री तिकुंडे यांच्या शांततामय व साध्या प्रचारानिमित्त समाधान व्यक्त केले.




