ताज्या बातम्या

नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

कळंबोली : शारदीय नवरात्रोत्सव २०२६ च्या पवित्र पर्वावर कळंबोलीची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिरात डॉ. गोरखनाथ पोळ व अंजना महादेव पोळ लिखित ‘नवरात्रीचे नऊ रंग’ या माहितीपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
नवरात्र नऊ दिवसच का साजरे केले जाते, देवीची नऊ रूपे कोणती, नवरात्र आपल्याला काय शिकवते, नवरात्रीत कोणत्या आरत्या म्हटल्या जातात, विजयादशमीचे महत्त्व काय आणि दसऱ्याला आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून का वाटली जातात, अशा विविध प्रश्नांची माहिती या पुस्तकातून सोप्या आणि रंजक भाषेत देण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवापासून विजयादशमीपर्यंतच्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरा, देवीची उपासना, आरत्या, पूजनपद्धती आणि संस्कारांचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. अंजना प्रकाशनचे हे पहिलेच पुस्तक असून, S Napkin Bouquet’s Satkar Houseच्या डायरेक्टर मानसी पोळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
पुस्तकाचे प्रकाशन आप्पासो (नाना) खलाटे, सौ. जयश्री खलाटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष
अमित पोटे व मंगेश गायकर
खजिनदार
अविनाश अब्दगीरे
सेक्रेटरी
गणेश शिंदे रामदास पोळ, स्वाती पोळ, मानसी पोळ, जहागीरदार सर, संदीप खलाटे तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लेखक डॉ. गोरखनाथ पोळ यांनी हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावे आणि भारतीय संस्कृती व परंपरांचा वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी सामाजिक व नवरात्रोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
संपर्क : अंजना प्रकाशन – 7021758175

Scroll to Top