ताज्या बातम्या

आनंदयात्री पर्यावरण सेनेचे अध्यक्ष तानाजी घाग यांचा सन्मान

ठाणे : आनंदयात्री पर्यावरण सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेनेचे उपाध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोजदादा शिंदे यांनी तानाजी घाग यांचा सन्मान केला. यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी तसेच संघटनेच्या विस्तारासाठी आवश्यक त्या ठिकाणी खंबीर साथ देण्याची ग्वाही मनोज शिंदे यांनी दिली.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक तथा सांगली जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख योगेश जानकर यांचीही तानाजी घाग यांनी भेट घेतली. यावेळी सांगली जिल्ह्यातील तीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीसह विविध पर्यावरणीय प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आनंदयात्री पर्यावरण सेनेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन तसेच सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. संघटनेच्या आगामी कार्यासाठी आपण खंबीरपणे सोबत राहू, अशी ग्वाही योगेश जानकर यांनी दिली.
या भेटीप्रसंगी संघटनेच्या आगामी विस्तारासह पर्यावरण क्षेत्रातील विविध उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली. नियुक्तीनंतर मिळालेल्या या सहकार्याबद्दल तानाजी घाग यांनी मनोज शिंदे व योगेश जानकर यांचे आभार मानले.

Scroll to Top