
मुंबई(अजित जगताप) : सर्वसामान्य सातारकरांसाठी अर्थवाहिनी असावी. यासाठी ५३ वर्षांपूर्वी आदरणीय ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या नेतृत्वाखाली सहकार्यांनी जावळी बँकेची स्थापना केली होती. आज या बँकेच्या ५३ व्या वार्षिक सभेसाठी बँकेचे हित पाहणारे सभासद कमी आणि लाभार्थी यांची संख्या लक्षणीय झाली आहे. या लाभार्थींसाठी सुख सुविधा व वाहन पुरवठा केल्यामुळे अनेकजण मुंबईला रवाना झाल्याची माहिती बँकेच्या हितचिंतकांनी दिलेली आहे.
ह. भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजूर करणे.५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि | ५२ वा वार्षिक अहवाल २०२४-२५ इतिवृत्ताचे वाचन करून तो मंजूर करणे. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे ताळेबंद पत्रक , नफा-तोटा पत् आणि संचालक मंडळाचा अहवाल विचारात घेऊन त्याला मंजुरी देणे. चालू आर्थिक वर्षातील शुद्ध नफ्याची विभागणी करणे आणि सभासदांसाठी लाभांश जाहीर करणे वैधानिक लेखापरीक्षक नियुक्ती करणे. त्यांचे मानधन ठरवणे.दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजित खर्चाच्या पत्रकाला मंजुरी देणे. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर ऐन वेळच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे. हे मुख्य विषय आहेत. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार कर्जे ₹६७३.६२ कोटी एकूण गुंतवणूक ₹४१८.५७ कोटी स्वतःचे भांडवल व निधी ₹१४४.६२ कोटी निव्वळ नफा ₹१०.४० कोटी झालेला आहे. जावळी बँकेची निवडणूक तोंडावर आली असल्याने संचालकपदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे बँकेचे किमान पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत मूल्य असणारे शेअर्स असणे बंधनकारक आहे. हे शेअर्स उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वी किमान २४ महिने (२ वर्षे) सलगपणे उमेदवाराच्या नावावर जमा असावेत. आवश्यक ठेवी किमान मुदत ठेव उमेदवाराची बँकेत किमान पन्नास हजार किंवा त्याहून अधिक रक्कमेची मुदत ठेव असणे आवश्यक असते. असा आर.बी.आय. ने नवीन नियम प्रसारित केल्यामुळे कष्टकरी, हातगाडी वाले, माथाडी, सामान्य सातारकर यांना बँकेचे संचालक होणे आता स्वप्न ठरणार आहे.काही नागरी बँकांमध्ये हा आकडा आर.बी.आय.च्या ‘अ’ वर्ग निकषानुसार अधिक असू शकतो. ही ठेव देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान २ वर्षे बँकेत अखंडितपणे असणे गरजेचे आहे. संचालक पदासाठी कर्जदार नसणे. जामीन राहिला असला तर कर्ज थकबाकीत नसावे. अशी नियमावली असल्यामुळे बँकेच्या मुख्य कार्यालयातून निवडणूक नियमावलीची प्रत पाहणे . एवढेच सामान्य सभासदांच्या हाती राहिले आहे. याला विरोध केला तर आपल्या नातेवाईकाला भाईंदर शाखेत बदली होईल. अशी काहींनी भीती व्यक्त केली आहे.
रविवार दिनांक २१ जून रोजी सकाळी दहा वाजता मुंबई येथील दादर या ठिकाणी होणाऱ्या ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे जावली बँकेच्या वार्षिक सभेसाठी काही सभासद गैरहजर राहतात. जे सत्ताधारी संचालकांच्या मनमानी कारभाराला साथ देतात. त्यांच्यासाठीच ही वार्षिक सभा असल्याची टीका आता बँकेचे कामकाज जवळून पाहणाऱ्या विरोधक करू लागलेली आहेत. भविष्यात जावळी बँकेला विरोध करायचा असेल तर ५० लाखाची ठेव ठेवावी लागेल. असा नवीन नियम लादला तर नवल वाटणार नाही. अशी प्रतिक्रिया अनेक सभासदांनी दिलेली आहे.
जावळी बँकेच्या प्रगतीपेक्षा वार्षिक सभेच्या निमित्ताने काही लाभार्थींना लाभ मिळत असल्याने बँकेच्या वस्तूस्थितीबाबत कोणीही बोलत नाही. हे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात जावळी बँकेच्या अभ्यासू व नाराज सभासदांनी प्रतिवार्षिक सभा घेऊन झालेल्या कारभाराबाबत वस्तूस्थिती समोर आणावी. अशी मागणी होऊ लागलेली आहे. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या तसबिरीचे पूजन होत आहे. परंतु त्यांचे विचार पायदळी तुडवले जात आहे. याबाबत आता सभासदांनीच विचार करावा. असे काहींनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले आहे. दरम्यान, जावळी बँकेची वार्षिक सभा झाल्यानंतर सभासद मनोगत व्यक्त करणार आहेत. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
——————————————————–
जावळी बँकेचे बोधचिन्ह




