मुंबई परेल : दहावी आणि बारावीच्या नंतर स्पर्धा परीक्षा हा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द सोशल सर्व्हिस लीग, परेल यांच्या विद्यमाने द युनिक अकॅडेमी, पुणे यांनी शनिवार दि ४ जुलै २०२६ रोजी स. ११ वा स्पर्धा परीक्षा एक सुवर्ण संधी या सत्राचे आयोजन द सोशल सर्व्हिस लीगच्या सभागृहात केले आहे. या सत्राला मार्गदर्शक म्हणून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामावंत तज्ज्ञ द युनिक अकॅडमी पुणे या संस्थेचे संचालक मा. तुकाराम जाधव सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षा तसेच नागरी सेवा क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.



