तुळसण : निनाईदेवी सेवाभावी संस्था, तुळसण (ता. कराड) यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, विठोबाचीवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम यंदा सलग आठव्या वर्षी पार पडला.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळावे आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने संस्थेने ही सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सलग आठ वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवून ‘शिक्षण हीच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली’ हा संदेश निनाईदेवी सेवाभावी संस्थेने आपल्या कार्यातून दिला आहे. शैक्षणिक साहित्य वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक तसेच शाळेतील शिक्षकांनी स्वागत करून निनाईदेवी सेवाभावी संस्थेचे आभार मानले. सामाजिक कार्याबरोबरच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचे संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. उपस्थित अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ शिक्षक वृंद




