कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : शिराळा, कराड व पाटण तालुक्यातील १०५ गावातील शेतीला वारणेचे पाणी बंद पाइपलाइनद्वारे मिळावे, यासाठी सुरू असलेल्या लढ्याला यश आले असून श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनामुळे नव्याने पाच टप्प्यात शिराळा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे.
डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढ्यातील दुसऱ्या टप्प्याला यश मिळाले. यानिमित्त घोगाव, ता. कराड येथे कराड व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा भव्य विजयी मेळावा नुकताच झाला. या मेळाव्यास श्रमिक मुक्ती दलाचे
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सखाराम पाटील, बाबासाहेब पवार, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यकारिणी सदस्य उदय पाटील, अशोकराव पाटील, धनाजी पाटील, टी. के. पाटील, मारुती देसाई, महेंद्र मोरे, जालिंदर कोळगे, आबासाहेब शेवाळे, नारायण साळुंखे, शंकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटण विभागातील सर्व महिलांनी योजना पूर्ण होईपर्यंत सहभाग घेतला पाहिजे. महिलांचा पाण्याचा संबंध शेतीबरोबरच पिण्यासाठी व खर्चासाठी जास्त येतो, असे आवाहन पाणी संघर्ष समिती कार्यकर्ती प्रियांका गुरव यांनी केले.
कार्यक्रमात हणमंत पाटील, बाळासाहेब माने, संदीप पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश काळे, पांडुरंग डांगे, दिनकर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कराड व पाटण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




