कराड (वार्ताहर) सत्यजित बिल्डर्स आणि डेव्हलपर्स चे सर्वेसर्वा माजी पंचायत समिती सदस्य काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील आप्पा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दिनांक 27 रोजी हॉटेल सत्यजित विट्स येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले, यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले , महिलांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिरास भेट दिली व रक्तदान देऊन रक्तदान म्हणजेच जीवनदान या उपक्रमास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला, यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील आप्पा, बाळासाहेब पाटील आबा, मुकुंद पाटील चाचा, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा पाटील माई, यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेचे डॉ. यादव, काँग्रेसचे सरचिटणीस अजित पाटील आप्पा चिखलीकर, दैनिक ललकारचे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती, दिनांक 28 रोजी, सायंकाळी 5 वाजता, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीबद्दल आणि वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन हॉटेल विट्स गोटे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सुनंदा पाटील माई यांनी दिली या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे वतीने आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे .




