सातारा(अजित जगताप)

: क्रांतिकारी जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होऊन गेलेले आहेत. काही सध्या कार्यरत सुद्धा आहेत. ही अभिमानाची गोष्ट म्हणजे देशासाठी शहीद झालेले अशोक कामटे हे सातारचे पोलीस अधीक्षक होते. त्याचबरोबर सातारचे सुपुत्र व दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे शहीद पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे हे सुद्धा सातारचे सुपुत्र आहेत. अशा या सातारा जिल्ह्यात एका पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली नंतर त्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांबळे गटाचे जयवंत शिवदास कांबळे यांनी निषेध नोंदवण्यासाठी स्वतःचे मिशी काढली आहे. याची संपूर्ण सातारा शहरात चर्चा सुरू झालेली आहे.
गेली वर्षभरापासून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्या अधिकाऱ्याची विभाग खाते मार्फत चौकशी करावी. तसे न केल्यास आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिलेला आहे. सध्या या पोलीस अधिकाऱ्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात बदली झालेली आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर त्यांच्या कार्याचे कौतुक व त्यांना प्रेरणा देण्यासाठी स्वागत व पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा दिल्या जातात. मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व संघटना त्यांच्या कार्यालयात गर्दी करतात. परंतु, सातारा जिल्ह्यात सातारा शहर पोलीस ठाण्यात बदली झालेल्या अधिकाऱ्याचा निषेध म्हणून स्थानिक नागरिकांनी मिशी काढण्याचा प्रकार घडल्यामुळे खळबळ माजली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भर कडक उन्हात श्री जयवंत कांबळे यांनी स्वतःचीच कारागीरा मार्फत मिशी काढलेली आहे. याबाबत आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? त्यांच्या चांगल्या कामाची नोंद घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याबाबतचे निवेदन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व सातारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते श्री कांबळे यांनी भिशी काढण्याचा प्रकार नेमका कोणत्या कारणासाठी केला आहे? याची आता जनतेला उत्सुकता लागली आहे. ____________________________ फोटो– सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर त्याचा निषेध म्हणून मिशी काढताना जयवंत कांबळे




