मुंबई : कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी चाइल्ड उन्नती फाउंडेशन तर्फे आर्थिक मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. ही मदत संत गाडगे महाराज अनाथ आश्रम, दादर येथे प्रदान करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातून उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांना, विशेषतः के.ई.एम. हॉस्पिटल येथे उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना आणि लहान मुलांना फाउंडेशनकडून सातत्याने मदतीचा हात दिला जात आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारात खंड पडू नये, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप धडस, दिलीप शिंदे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचा संकल्प फाउंडेशनने यापुढेही कायम ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




