करहर(अजित जगताप) : छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन गट व पंचायत समितीच्या सहा गणासाठी अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे. आता मतदानाची घटिका जवळ आली आहे. अशा वेळेला स्थानिक व परिचित उमेदवारांना प्राधान्य द्या आणि हक्काने मतदान करा. वेळ पडल्यास माणुसकी म्हणून निवडणुकीपुरते आलेल्या पाहुणे उमेदवारांचा आदरतिथ्य ठेवा. त्यांना साडी- चोळी द्या किंवा पुरुष उमेदवाराला टावेल- टोपी द्या पण, आपल्या हक्काचे मतदान स्थानिक व परिचित उमेदवारांनाच करा असे आवाहन आता स्थानिक मतदारांतून होऊ लागलेले आहे. जे उमेदवार स्थानिक राहत आहेत. तेच आपले खरे लोकप्रतिनिधी असतात. याची आठवण करून दिली आहे.
निवडणुका म्हटलं की, पैशाचा बाजार असतो. या बाजारामध्ये खरे चालतात. म्हणून खोटे सिक्के चालवले जातात. त्याचा परिणाम पाच वर्ष भोगावा लागतो. याचा जावळी तालुक्याने निवडणुकीच्या काळात अनेकदा अनुभव घेतला आहे. फक्त मतदार यादीमध्ये नाव आहे आणि मूळचे गाव आहे. म्हणून, काहीजण उमेदवारी लादतात .त्यानंतर पराभूत झाल्यानंतर आपापल्या रहिवास असलेल्या ठिकाणी निघून जातात. काही वेळेला गावात घडलेल्या सुखदुःखाच्या प्रसंगी स्थानिक उमेदवारास सक्रिय सहभाग घेतात. अशा उमेदवारांची नाळ जोडले गेलेले असते. याउलट राजकीय पक्ष किंवा व्यक्तीनिष्ठे पायी काही उमेदवार वैचारिक भूमिका मांडत असतात परंतु त्यांना आपल्या घराच्या शेजाऱ्यातील भावकीतील लोक सुद्धा ओळखत नाहीत . मतदान झाल्यानंतर त्यांना शोधताना नाकी नऊ येणार आहे.
स्थानिक उमेदवारांचा जय हो किंवा पराजय हो.. ते गावातच राहतात. गावातच थांबतात .गावातीलच सुखदुःखात सक्रिय सहभाग घेतात. याची आता प्रत्येक खेड्यापाड्यात चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट झाल्याचे मानले तर वावगे ठरणार नाही.
जावळी तालुक्यामध्ये कुडाळ, कुसुंबी व म्हसवे असे तीन गट आहे. या तिन्ही गटांमध्ये पुरुष व महिला अशा पाच उमेदवार हे आपापल्या गावांमध्ये स्थायिक आहेत. त्यांना परिसराची चांगली जाण आहे. तसाच म्हसवे, खर्शी बारामुरे, कुडाळ, सायगाव, आंबेघर, कुसुंबी गणात सुद्धा असाच प्रकार आहे.
जावळी तालुक्यात गट व गणातील काही राजकीय पक्षाचे व अपक्ष उमेदवार हे चक्क नवी मुंबई, पुणे, मुंबई, पाचगणी, पुणे, सातारा शहर या ठिकाणी राहून आपापले संसार करतात. अधून मधून गावी येतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी त्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यापेक्षा आपल्या स्थानिक उमेदवार हा चोवीस तास उपलब्ध होऊ शकतो. असे ज्येष्ठ मतदारांना वाटत आहे. त्यासाठी त्यांनीही जनजागृती सुरू केली आहे. ही खरी अर्थाने परिवर्तनाची नांदी आहे.
काहींच्या गावात उमेदवारी दिली असली तरी गावातील ज्येष्ठ नागरिकांशी त्यांचा कोणताही परिचय नाही. संपर्क नाही. त्यापेक्षा नेहमी संपर्कात असणाऱ्या उमेदवारांना पसंती दिली जात आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळत असल्याने त्यांच्या विजयासाठी स्थानिक मतदार नक्कीच मतदान करतील असा काही उमेदवारांनी विश्वास व्यक्त केला.
.________________________________________
फोटो — गावातील सर्वच कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या स्थानिक महिला आहेत .प्रचारातही उपस्थित असतात. या छायाचित्रावरून स्पष्ट झाले आहे..




