ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त, ठाण्यात “गांधींहत्या आणि आपण” या विषयावर व्याख्यान

ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, ३० जानेवारी-२०२६ रोजी, सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात “गांधीहत्या आणि आपण” या विषयावर एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मराज्य पक्ष, ठाणे जिल्हा काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोर्डे व डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे हे दोन्ही प्रभावी वक्ते, गांधींच्या विचारविश्वावार प्रकाशझोत टाकणार आहेत. दरम्यान, आपल्यातील समाजघातकी-राष्ट्रद्रोही आणि अतिरेकी अशा उजव्याशक्तींचा यथोचित समाचार घेतानाच, सर्वसामान्यांना अज्ञात असणाऱ्या गांधीजींची ओळख या माध्यमातून होईलच; मात्र, त्याचबरोबर गांधीहत्येचं नेमकं सत्यदेखील या व्याख्यानातून पुढे येणार आहे. यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, आजपर्यंत ढोंगी व जात्यंध हिंदुत्ववाद्यांकडून महात्मा गांधींबद्दल तसेच, त्यांच्या हत्येसंदर्भात अनेक अफवा बेमालुमपणे प्रसारित केल्या गेल्या. त्या सप्रमाण पुराव्यांसह खोडून काढण्याचं महान कार्य, या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. व्याख्यानाच्या या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले असून, मूलभूत अधिकार संघर्ष समिती या संघटनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, जास्तीतजास्त ठाणेकर नागरिकांनी उपस्थित राहून, गांधीविचार आत्मसात करावेत व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केले आहे.

Scroll to Top