प्रतिनिधी : कराड तालुक्यातील सर्व गजानन महाराज भक्तांना आनंदाची बातमी दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ पासून कराड ते शेगाव अशी एस.टी. बससेवा सुरू झाली आहे.
बस वेळापत्रक असे असेल :0कराडहून सुटणे: दररोज दुपारी १२:३० वाजता, शेगाव येथे पोहोचणे: पहाटे ४:३० वाजता, शेगावहून परतीची बस: दुपारी ४:३० वाजता, कराड येथे आगमन: सकाळी ८:०० वाजता मार्ग:
कराड – विटा – आटपाडी – पंढरपूर – बार्शी – बीड – जालना – चिखली – खामगाव – शेगाव ही बस विटा आगाराची असून, गजानन भक्तांसाठी अतिशय सोयीची सेवा ठरणार आहे. म्हणून सर्व भक्तांनी या बससेवेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा, ही नम्र विनंती.