सातारा(अजित जगताप) : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जॉईंट किलर ठरलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते (गवई गट) संजय गाडे यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली. या निवडीने सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन चळवळीमध्ये स्वाभिमानाने काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
जावळी तालुक्यातील कुसुंबी गावचे सुपुत्र असलेल्या व घराणेशाहीचा वारसा नसताना विद्यार्थी दशेतूनच पुरोगामी व दलित पॅंथर आणि रिपब्लिकन चळवळीत सक्रिय असलेले संजय
गाडे यांची रिपब्लिकन पक्षाच्या सातारा
जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य
निवडणूक अधिकारी डॉ. गौतम गोसावी यांनी जाहीर केली आहे. रिपब्लिकन योद्धा चॅनलच्या माध्यमातून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्भीड पत्रकारिता करून दाखवली आहे.
या निवडीबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे. घटनाकार व रिपब्लिकन पक्षाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील खुल्या पत्रावरील
आधारित असलेल्या या मूळ रिपब्लिकन पक्ष आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि त्यानंतर बिहार व आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल तसेच विधान परिषदेचे सभापती दादासाहेब तथा रा. सु. गवई यांनी समर्थपणाने रिपब्लिकन पक्षाची धुरा सांभाळली होती.
दादासाहेब गवई यांच्या निर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षात घराणेशाही नको म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी अध्यक्ष पद स्वीकारले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमावली नुसार रिपब्लिकन पक्षाचे
महाराष्ट्र राज्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गौतम गोसावी यांनी महाराष्ट्र राज्यातील २० जिल्हयातील जिल्हाध्यक्ष यांची निवड केलेली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायत आणि इतर निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने रिपब्लिकन योद्धा व सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांची निवड केल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे खंदे समर्थक चंद्रकांत दादा कांबळे व विशाल कांबळे यांनी दिली आहे.
सातारा लोकसभेच्या निवडणूकीत तुल्यबळ उमेदवार असतानाही तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संजय गाडे यांनी ३७,०६२ मतदान घेतले.यामुळे विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवाराला पराभवालाचा सामना करावा लागला. तसेच सातारा जिल्ह्यात प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दिसून आली.
सातारा जिल्ह्यातील गरीब मराठा, इतर मागासवर्गीय आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन, दलित अशा वंचित पिडित घटकातील लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा संघर्ष केला. अभ्यासपूर्ण, आक्रमकतेने भूमिका मांडली . स्वाभिमानी रिपब्लिकन नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. सातारा जिल्हयात त्यांना आंदोलनाचा बादशहा म्हणून ओळखले जाते. मुंडन व बोंबाबोंब, अर्धनग्न, घंटानाद, महाआरती अशी लोकशाही बळकट करणारी आंदोलने झाली . इथून पुढेही वंचित घटकांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या आंदोलनामुळे खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय गतिमान झाल्याची माहिती सेवानिवृत्त अधिकारी वर्गांनी दिली आहे. तसेच या निवडीबद्दल त्यांचे मान्यवरांनी पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.
______________________________
फोटो — रिपब्लिकन पक्ष गवई गट सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे