मुबंई प्रतिनीधी : वाडा तालुक्यातील सासणे (खैर) गावातील विश्वास परशुराम कांबेरे या २८वर्षीय तरूणाने साद्य केले.हे तरुण वाड्यातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.लहानपणापासून धावणे आवडता छंद, कोरोना काळात अधिक वेळ सराव करण्यास वाव मिळाला,आपल्या जीवाची बाजी लावून आत्यावश्यक सेवा देणाऱ्या डाॅक्टर व अन्य कोरोना योध्यांसाठी त्यांनी पहिल्यांदा वाडा ते जीवदानी मंदिर अशी ६० कि.मी.धाव घेऊन मानवंदना दिली होती.
वाडा ते वज्रेश्वरी, वाडा ते तिलसे असे लक्ष ठेवीत वाडा ते एकविरा देवस्थान १४८ किमी अंतर एका दमात पार केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
विश्वास याने डाॅक्टर, सैनिक,पोलीस, शेतकरी तसेच दि.बा.पाटील विमानतळ नावासाठी वाडा ते शिर्डी देवस्थान २२० किमी अंतर सलग दोन दिवसात पार केले होते.आणि आता वाडा ते उज्जन तीर्थक्षेत्र ६०० किमी अंतर आठ दिवसांत पूर्ण केले.
विश्वास हे काॅमर्स शाखेतील विद्यार्थ्यांचा प्राध्यापक असून काॅलेज संपले की रोज नित्यनियमाने १५ ते ३० किमी अंतर सराव करतात.
उज्जन तीर्थक्षेत्र गाठण्यासाठी तो सतत तीन महिने सराव करत होता.खर्डी,नाशिक,धुळे मार्गे उज्जन असा प्रवास पार केले.एप्रिल ते जून विश्वास सर विद्यार्थ्यांना रनिंग अकॅडमीच्या मार्फत मोफत धावण्याचे तंत्र शिकवत आहेत.या सोबत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर आयोजन करून तरुणांचे सामाजिक योगदान तो जगासमोर आणतो.धावण्याच्या अशा ध्येयासाठी विश्वास यांना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भरभरून मदत देखील केली असून ते आज विविध प्रसिद्ध खेळाडूंकडून मार्गदर्शन घेतात.
आहार, सराव तंत्र यासोबत प्रचंड आत्मविश्वास आपल्याला किती मोठ उद्दिष्ट गाठण्यात मदत करते असे विश्वास यांचे म्हणणे असून मृत्यूनंतर ही आपण जीवीत रहावे यासाठी हा प्रयत्न आहे असे ते सांगतात. उज्जन पर्यंत धावण्याच्या दरम्यान ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी १०७ किमी अंतर अनवाणी धावून राज्यात आजही अनेक शिक्षक तुटपुंजा मोबदल्यावर अध्यापनाचे काम करीत असून कौटुंबिक वाताहत डोळ्यात दिसत असतानाही अध्यापनाच्या कामात त्यांनी कधी खंड पडू दिला नाही.शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या सरकारने पुर्ण कराव्यात अशी या मागे भावना असून वाडा ते उज्जन ६०० किमी अंतर ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर एक धाव शिक्षक व मराठी माणसाच्या सन्मानासाठी ही धाव आहे असे त्याचे मत आहे.या त्याच्या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे माणसाने मनापासून जिद्द व रोजचा सराव हे तंत्र आत्मसात केले तर आपण निश्चित यशस्वी होतो हे जगाला दाखवून दिले.आपणास व्यसन मुक्त होण्यासाठी स्वतःला नेहमीच एक शिस्त लावून घ्या.आवडीचा छंद जोपासा एक वेळ तुम्ही जनतेसाठी एक आदर्श बनू शकता.
वाडा ते उज्जन तीर्थक्षेत्र ६००कि.मी. अंतर धावून पार केले !
RELATED ARTICLES