कराड(प्रताप भणगे) : येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. च्या चेअरमनपदी तुषार बाजीराव पवार, तर उपाध्यक्षपदी जयवंत जगन्नाथ पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांनी संचालक मंडळ व ग्रामस्थांसमवेत राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी श्री बाळासाहेब पाटील यांनी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक बाजीराव विष्णू पवार, माजी सभापती प्रणव ताटे, आण्णासो प्रल्हाद पवार, अभिजीत आप्पासो पवार, राजेंद्र बाजीराव पवार, शंकर विठोबा पवार, बाबुराव शंकर पवार, आझाद बादशाह मुल्ला, सुभाष जगन्नाथ पवार, विठ्ठल बाबू ताटे, सुभाष पवार (बाबा), भिकू खाशाबा पवार, शहाजी मारुती पवार, राजेंद्र किसन पवार, प्रवीण शंकर पवार, वैभव हणमंत पवार उपस्थित होते.