ताज्या बातम्या

कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीस ‘लेखन प्रेरणा दिन’चा दर्जा देण्याची मागणी

प्रतिनिधी : लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला. जातिव्यवस्थेच्या जाचामुळे बालपणात शिक्षण सोडावे लागले. गिरणीत काम करताना त्यांनी माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये कम्युनिस्ट नेत्यांच्या सहवासात सामाजिक भान मिळवले. शोषितांच्या वेदना, अन्यायाविरोधातील लढे, त्यांनी गाण्यांत, लावणीत, कथांमध्ये मांडले. ‘वारण्याचा वाघ’, ‘फकिरा’ यांसारख्या साहित्यकृतींमुळे ते देश-विदेशात ओळखले गेले.

अण्णा भाऊ साठे प्रेमी व लोक सांस्कृतिक मंचाचे सेक्रेटरी सुबोध मोरे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा आणि केंद्र सरकारनेही देशपातळीवर हा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जसे महाराष्ट्रात ‘कुसुमाग्रज दिन’, तर केंद्र सरकार ‘डॉ. कलाम वाचन प्रेरणा दिन’ साजरा करते, त्याच धर्तीवर हा निर्णय घेतल्यास अण्णा भाऊंच्या साहित्याचा जागर देशभर होईल.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top