ताज्या बातम्या

जी-उत्तर विभागातील माहीम रेल्वे स्टेशन ते माटुंगा रेल्वे स्टेशन एस.बी.रोडवर मेघा डीप क्लिनिसिंग विशेष मोहीम.

प्रतिनिधी : उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत सपकाळे यांच्या निर्देशान्वये तसेच सहाय्यक आयुक्त जी-उत्तर श्री अजितकुमार आंबी यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका मेघा डीप क्लिनिसिंग विशेष मोहीम दादर विभागातील सेनापती बापट या रोडवरील माहीम रेल स्टेशन ते माटुंगा रेल्वे स्टेशन पर्यंत आयोजीत करण्यात आली होती.
या मेघा डिप क्लिनिसिंग कार्यक्रमासाठी मनपा ६० कामगार,तसेच दुरूस्ती विभाग, गार्डन,किटक निमंत्रण मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या, अतिक्रमण विभाग,पाणी खाते इत्यादी खात्यातील कामगार कर्मचारी अधिकारी इत्यादींनी भाग घेतला होता.
विशेषतः घकव्य खात्यातील मोठ्या संख्येने मनुष्यबळ सहभागी झाले होते तसेच जेसीबी डंपर,मोठे व छोटे दाब यंत्र तसेच एससीव्ही,लिटर पिकर, मिसब्लोईंग,Manuel गाडी,फायरेक्स मशिनरी तसेच सक्शन मशिन इत्यादी यंत्रणाचा उपयोग करुन कचरामुक्त विभाग करण्यात आला.
या मोहिमेत माहीम स्टेशन ते माटुंगा स्टेशन चा विभाग धुऊन व ब्रशींग करुन घेतला आहे.
या मोहिमेत स्वच्छता दूत,तसेच मार्शल यांनी विभागात कचरामुक्त होण्यासाठी जनजागृती केली.
मेगा डीप क्लिनिसिंग मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेषत: सहाय्यक अभियंता तथा ओएसडी श्री काझी साहेब यांनी नेतृत्व केले तर इतर खातेप्रमुख यांनी मार्गदर्शन तसेच उत्तम सहकार्य केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top