Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रशिवसेनेने घेतली पावसाळ्यापूर्वीच नागरिकांच्या आरोग्याची काळजी – दिवा बी.आर.नगरमध्ये नाल्याची तातडीने...

शिवसेनेने घेतली पावसाळ्यापूर्वीच नागरिकांच्या आरोग्याची काळजी – दिवा बी.आर.नगरमध्ये नाल्याची तातडीने सफाई करून नागरिकांची भीती दूर

ठाणे : दिवा पूर्व येथील बी.आर.नगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साई सद्गुरू चाळ ते सरस्वती बिल्डिंगदरम्यान असलेल्या नाल्याची साफसफाई न झाल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य झाले होते. नाल्यात कचरा साचल्याने पाणी चाळींच्या आत शिरू लागले होते. परिणामी डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि नागरिकांमध्ये साथीचे रोग पसरतील अशी भीती निर्माण झाली होती.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शिवसेना दिवा पूर्व उपविभाग प्रमुख श्री. सूर्यकांत कदम यांनी ही बाब मा. रमाकांत मढवी साहेब (उपमहापौर व शिवसेना दिवा शहर प्रमुख), मा. सौ. दिपाली भगत (नगरसेविका) आणि मा. उमेश अशोक भगत (शिवसेना दिवा पूर्व विभाग प्रमुख) यांच्या निदर्शनास आणून दिली. या पदाधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत नालेसफाई विभागाशी समन्वय साधला आणि सदर नाल्याची साफसफाई करून घेतली.

या वेळी नाल्याची सफाई व्यवस्थित व संपूर्ण व्हावी म्हणून सूर्यकांत कदम, स्थानिक महिलावर्ग, तसेच समाजसेवक श्री. दीपक महादेव पाटील यांची उपस्थिती राहिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांचा आरोग्यधोका टळला असून, परिसरातील रहिवाशांनी शिवसेना आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

शिवसेनेने दाखवलेली तत्परता आणि सामाजिक भान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निश्चितच प्रशंसनीय आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments